कोल्हापूर

दाभोळ ः निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजरला अटक

CD

नीलिमाच्या मृत्यूप्रकरणी
कोल्हापूरच्या एकास अटक
चिपळूणमधील प्रकरणात कारवाई

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १८ ः चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नीलिमाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरून स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ गाव कोल्हापूर) याला रत्नागिरी येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः दाभोळ खाडीत उसगाव येथे एक ऑगस्टला मृतावस्थेत मिळालेल्या नीलिमाच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी दाभोळ सागरी पोलिस तपास करीत आहेत. तपासात नीलिमाच्या व्हिसेराची सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणीअंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे अहवालात नमूद आहे. बुडाल्यामुळे श्वास बंद होऊन मृत्यू असे नमूद केले आहे. पोलिसांनी चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली आहे. नीलिमाचे नातेवाईक सुधाकर चव्हाण यांनी चिपळूण पोलिस ठाणे येथे गुरुवारी (ता. १७) तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत स्टेट बँकेतील प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार संशयित गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तो दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.
तक्रारीत सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी नमूद केले आहे की, नीलिमा १५ एप्रिल ते २९ जुलै या काळात दापोली येथील बँकेत काम करीत होती. बॅंकेचा प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड (मूळ रा. कोल्हापूर) याला नीलिमा दैनंदिन कामकाजाचा अहवाल देत असे. नीलिमा सुटीवर असतानाही गायकवाड वारंवार दूरध्वनी करून तिला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुचवित होता. नीलिमाला दिवसाला ४ ते ५ डी-मॅट खाती उघडण्यासाठी गायकवाड जाणूनबुजून दबाव आणत असल्याचे नीलिमाने मला व तिचा भाऊ अक्षय याला सांगितले होते. गायकवाड हा नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दबाव आणत होता. नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करूनदेखील तिला काम जमत नसल्याचे बोलून कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती. ती घरामध्ये व्यवस्थित जेवत नव्हती.
चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीअन्वये दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे नीलिमाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत संग्राम गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी (ता. १७) रात्री अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT