कोल्हापूर

जिव्हाजी बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश

CD

ich2012.jpg
24638
इचलकरंजी ः जिव्हाजी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आनंद मांगलेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
-----------------
जिव्हाजी बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश
अध्यक्ष मांगलेकर ः लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करणार
इचलकरंजी, ता. २१ ः जिव्हाजी सहकारी बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष आनंद मांगलेकर यांनी केली. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे झाली. बँकेच्या मुख्यालयासह सर्व पाचही शाखांचे कामकाज डिजिटल माध्यमातून सुरू आहे. लवकरच युपीआय, आयएमपीएस, मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी बँकेचे स्वतःचे मोबाईल अॅप सर्व ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेची जवाहरनगर व रेंदाळ शाखा सुरू झाली आहे, तर गांधी कॅम्प व राजारामपुरी (कोल्हापूर) या दोन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष श्रीकृष्ण खामकर यांनी दिली. बँकेचे सभासद व ग्राहक यांना चांगली सुविधा प्राप्त होण्यासाठी शाखा स्तरावर ग्राहक सेवा समितीची नियुक्ती केल्याचे तज्ज्ञ संचालक संजय सातपुते यांनी सांगितले. बँकेकडील उत्कृष्ट ग्राहकांना प्रमाणपत्र देऊन सन्मनित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे नूतन अध्यक्ष अनिल भंडारे, शहराध्यक्ष रमेश कनोजे यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT