कोल्हापूर

आमदार जाधव पाहणी

CD

24944

आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका
जयश्री जाधव ः हुतात्मा पार्कची केली पाहणी

कोल्हापूर, ता. २१ ः कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत. निधीसाठी पाठपुरावा करून तो मंजूर करून आणून श्रेय घ्यावे, असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.
आमदार जाधव यांनी हुतात्मा पार्कला भेट देऊन तिथे आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. महापालिका अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच सुशोभीकरणाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करावे अशी सूचनाही केली.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘‘हुतात्मा पार्क व महावीर गार्डनच्या सुशोभीकरणाचा आराखडा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी तयार केला.तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन टप्प्यात जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर केला. पण जनतेने नाकारलेले त्याचे श्रेय घेत आहेत. त्यांनी दिशाभूल करू नये.
दिवंगत आमदार जाधव यांनी शहरातील सर्व मैदाने व क्रीडांगणाचा विकास झाला पाहिजे यासाठी आराखडे तयार करून घेतले. गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, बावडा पॅव्हेलियन, सासने मैदान, शिवाजी स्टेडियम, महावीर गार्डन, हुतात्मा पार्क, रस्ते (नगरोत्थान योजना), रंकाळा या कामांसाठी निधी मिळवण्याचा पाठपुरावा सुरू होता. त्यांना निधी मिळून आता कामे सुरू होत आहेत. तिथे जाऊन आपणच पाठपुरावा केला, असे दाखवण्याचा खटाटोप काहीजण करीत आहेत.’
शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सुरेश पाटील, आर्किटेक्ट प्रशांत हडकर, माजी नगरसेवक विनायक फाळके, बाळासाहेब निचिते, पांडुरंग पाटील, चंद्रकांत कांडेकरी, शहानुर देसाई, बॉबी सांगलीकर, नंदकिशोर देशपांडे, मुनीर मोमीन, रावसाहेब शिंदे, नंदकुमार नलवडे, शिवाजी नलवडे, इनायतुला गडकरी, मारुतीराव चौगुले, राम डवाळे, दिनकर मगदूम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT