कोल्हापूर

इतरांचे संशोधन आपल्या नावावर प्रकाशित करण्याचा प्रकार

CD

इतरांचे संशोधन आपल्या नावावर प्रकाशित

डॉ. राजवर्धन कापशीकर यांचा आरोप; आक्षेपार्ह शोधनिबंधांची शिवाजी विद्यापीठाला माहिती सादर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘मी संशोधक म्हणून ज्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाकडे पाहतो. त्यावेळी विद्यापीठाचा संशोधनातील नावलौकीक वाढावा, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसून आले. विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील काही प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी इतरांचे संशोधन आपल्या नावावर प्रकाशित करण्याचे प्रकार घडले आहेत’, असा आरोप कोल्हापुरातील विचारेमाळ येथील डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
डॉ. कापशीकर म्हणाले, ‘संशोधन आणि त्याविषयीच्या शोधनिबंधांमध्ये कॉपी-पेस्ट केल्याचा प्रकार गेल्या सात महिन्यात माझ्या लक्षात आले. त्यावर मागील दोन महिन्यांत अधिक खोलात जावून माहिती घेतली असता विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, नॅनोटेक्नॉलॉजी, सूक्ष्मजीवशास्त्र आदी विभागातील २२ धक्कादायक प्रकार माझ्यासमोर आले आहेत. वनस्पतीशास्त्र विभागातून कर्करोगावर एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. जो त्यापूर्वी दुसऱ्या एका संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाला होता. स्वतःचा शोधनिबंध दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन वेगळ्या संशोधनपत्रिकेत एका आठवड्याच्या अंतराने प्रकाशित केला आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागात यापूर्वी प्रकाशित झालेली संशोधनाची संकल्पना एका अमेरिकन संशोधन पत्रिकेत शोधनिबंधातून वापरली आहे. ॲग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या शोधनिबंधातील माहितीही यापूर्वी प्रकाशित झालेल्या इतर शोधनिबंधामधील आहे. संशोधनातील अशा कॉपी-पेस्ट प्रकरणांची माहिती गेल्या महिन्यात विद्यापीठ प्रशासनातील कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवांना दिली आहे. सरकार संशोधनासाठी निधी खर्च करते. ज्यावेळी संशोधनाची संधी दिली जाते. त्यावेळी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे संशोधन करावे.’
.....

संशोधनाच्या दर्जाबाबत गैरप्रकारांना
पाठीशी घालणार नाहीः कुलसचिव डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठाकडे २६ जुलै रोजी डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी सादर केलेल्या तक्रारीमध्ये विद्यापीठाच्या अधिविभागातील संशोधनासंदर्भात काही आरोप केले आहेत. विद्यापीठातील काही संशोधक इतरांचे संशोधन आपल्या नावे प्रसिद्ध करीत असल्याबाबत आरोप केले आहेत. या तक्रारीच्य अनुषंगाने त्यांनी ज्या-ज्या संशोधन निबंधासंदर्भात आक्षेप घेतले आहेत. त्या-त्या संशोधन निबंधांच्या संशोधक शिक्षक, मार्गदर्शकांना त्यांचे म्हणणे सादर करण्याकरिता विद्यापीठाने यापूर्वीच कळविले आहे. त्यांचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर या आरोपामध्ये तथ्य आढळल्यास विद्यापीठ पुढील चौकशीची दिशा निश्‍चित करेल. विद्यापीठ संशोधनाच्या दर्जाबाबत कोणत्याही गैरप्रकारांना पाठीशी घालणार नाही, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली.
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT