कोल्हापूर

आमदार जयंत पाटील

CD

दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलः शुक्रवारी होणाऱ्या सभेच्या तयारीची केली पाहणी

कोल्हापूर, ता.२१: कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने लढावे, अशी आमची इच्छा असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला.
शाहू- फुले- आंबेडकर यांचे पुरोगामी विचार घेवून ज्येष्ठ नेते शरद पवार काम करत आहेत. मात्र ज्यांना हे विचार मान्य नाहीत, त्यांनी पवारांपासून फारकत घेतली असल्याची टीकाही त्यांनी केली. शुक्रवारी (ता.२५) दसरा चौक येथे शरद पवार यांची सभा होत आहे. सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आले असता आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार व अजित पवार यांच्या वारंवार होणाऱ्या‍ भेटीबाबत बोलताना आमदार पाटील म्‍हणाले, ‘गेली अनेक वर्षे एकत्र असणारे लोक, नेते पक्षापासून बाजूला गेले आहेत. ते शरद पवार यांना भेटण्यासाठी येतात. मात्र ते भेटले म्‍हणजे त्यांचे विचार मान्य केले, असे होत नाही. शरद पवार यांच्या राज्यभर सभा होणार असून सर्व संभ्रम दूर होतील. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत आपणास काही माहिती नसल्याचे आमदार पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे,रोहित पाटील,सरोजिनी जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
....
फुटून गेलेल्यांना टार्गेट नाही
पाटील म्हणाले, ‘ राष्‍ट्रवादीतून फुटून गेलेल्यांना टार्गेट करण्यासाठी शरद पवार यांच्या सभा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही तथ्य नाही. श्री.पवार यांच्या सभेबाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे. संबंधित जिल्‍ह्यातील कार्यकर्त्यांनी सभा घेण्याचा आग्रह केल्याने सभा घेतल्या जात आहेत. कोणाच्याही मतदारसंघात सभा झालेल्या नाहीत. जिल्‍ह्यात सभा होत आहेत.’
...

तलाठी परीक्षेत घोटाळा झाल्याची शक्यता

तलाठी परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांना बसू दिलेले नाही. ही गंभीर बाब आहे. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर गोंधळ झालेला आहे. या परीक्षेत काहीतरी घोटाळा झाल्याचे दिसत आहे. सरकारने यामध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

...
मंत्री मुश्रीफ यांना शरद पवारांबद्दल आदर
मंत्री मुश्रीफ यांना शरद पवारांबद्दल आदर आहे. यात शंका घेण्याचे कारण नाही. मात्र त्यांनी अशी भूमिका का घेतली, हे सांगू शकत नाही. सभा होत जातील तसे शरद पवार याबद्दल बोलतील. शुक्रवारी (ता.२५) होणाऱ्या‍ सभेतही ते आपली भूमिका स्‍पष्‍ट करतील, असे आमदार पाटील यांनी सांगत जणू सभेचा ट्रेलरच स्‍पष्‍ट केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT