कोल्हापूर

दुचाकी चोरट्याला अटक ८ दुचाकी जप्त

CD

खुपीरेतील दुचाकी चोरट्याला अटक

१ लाख ६० हजारांच्या ८ दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः दुचाकी चोरटा संभाजी यल्लाप्पा नंदीवाले (वय ३५, रा.शिंदेवाडी रोड, खुपीरे, ता.करवीर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या दुचाकींची किंमत सुमारे १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवार (ता.२६) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बालिंगा, दोनवडे मार्गे खुपीरे या मार्गावरून निघालेले असताना त्यांना नंबरप्लेट नसलेली एक दुचाकी आढळली. त्यांनी दुचाकी थांबवली व चौकशी केली असता दुचाकी चालवणाऱ्या संभाजी नंदीवाले याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संभाजी याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३ दुचाकी चोरल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ८ दुचाकी जप्त केल्या. संबंधित पोलिस ठाण्याकडे या दुचाकी दिल्या जाणार आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी ३ दुचाकींचे मालक निष्पन्न झाले आहेत. दरम्यान, या दुचाकी संभाजी हा कोकणात विकणार होता. मात्र एजंट न मिळाल्याने त्या अद्याप विकलेल्या नव्हत्या, असेही पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दावणे, रणजित पाटील, अमोल चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT