‘सकल हिंदू समाजातर्फे
मंगळवारी दुचाकी फेरी’
कोल्हापूर : सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेनिमित्त दहा ऑक्टोबरला दुचाकी फेरीचे आयोजन केले आहे, अशी माहिती दीपक देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. ताराराणी पार्क येथून दुपारी चार वाजता त्यास सुरवात होईल. देसाई म्हणाले, ‘शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, मावळ्यांचे आत्मबलिदान भावी पिढीला कळावे, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे शौर्य जागरण काढली जात आहे. ती राष्ट्रव्यापी यात्रा असून, तिचे कोल्हापुरातील ताराराणी चौकात दुपारी आगमन होत आहे. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी ते प्रायव्हेट हायस्कूल असा तिचा मार्ग आहे. ‘प्रायव्हेट’मध्ये सभा झाल्यानंतर चित्ररथासह यात्रेचा पुन्हा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक असा मार्ग राहील.’ सुरेश यादव, किरण दुसे, सुनील सामंत, मनोहर सोरप, गजानन तोडकर, उमाकांत राणिंगा, उदय भोसले, किशोर घाटगे, आशिष लोखंडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.