कोल्हापूर

वृक्षांची खुलेआम कत्तल

CD

ich813,14.jpg
36610
इचलकरंजी ः १) वृक्षावर घाव घालण्यात आलेल्या ठिकाणी शेणखत, मातीचा लेप लावताना व्हीजन इचलकरंजी संस्थेतील वृक्षमित्र.
36611
२) अशा प्रकारे विकृत प्रवृत्तींनी वृक्षावर घाव घातले आहेत.
--------
वृक्षांची खुलेआम कत्तल
इचलकरंजीतील थोरात चौकात प्रकार ः महापालिकेने कारवाई करण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ ः लोकसहभागातून लावलेल्या वृक्षांवर विकृत प्रवृत्तीकडून पुन्हा एकदा घाव घातल्याचा प्रकारसमोर आला आहे. थोरात चौकातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी लावलेल्या एक - एक वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. आतापर्यंत १५ वृक्षांना नुकसान पोहचवले आहे. या प्रकाराबद्दल वृक्षप्रेमी नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अशा प्रवृत्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
थोरात चौकाचा परिसर हा उजाड होता. येथे व्हीजन इचलकरंजी संस्थेने पुढाकार घेत तीन - चार वर्षापूर्वी सुमारे १६० वृक्षांची लागवड केली. यासाठी पूर्णतः समाजातील विविध लोकांचे सहकार्य घेतले. वृक्षारोपणानंतर त्याची पुरेशी काळजीही या संस्थेच्या वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी घेतली. वृक्षांना दररोज पाणी सोडण्यासाठी त्यांची देखभाल सुरु ठेवली. त्यामुळे बहुतांश वृक्ष मोठे होवून गर्द सावली देण्यास तयार होत आहेत. एकीकडे सामाजिक दातृत्वातून येथे हिरवाई फुलत असताना दुसरीकडे काही अपप्रवृत्ती येथे बळावत चालली आहे. त्यांच्याकडून अशा वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यास सुरुवात केली आहे.
कार्यकर्त्यांनी या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करीत एक-एक वृक्षाला जगवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु ठेवले आहेत. नैसर्गीकदृष्ट्या खराब झालेल्या ठिकाणी नविन वृक्ष लावले जात आहेत. त्यामुळे हा परिसर आता हिरवा गर्द होण्याच्या मार्गावर आहे. पण अपप्रवृत्ती बोकाळतच आहे. आज वृक्षांना पाणी घालण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आणखी एका टुमदार वृक्षावर घाव घातल्याचे दिसून आले. तर आणखी एका वृक्षाचा बुंधाच तोडून टाकला आहे. यामुळे वृक्षप्रेमी कार्यकर्ते संतापले आहेत. एकिकडे औद्योगिक शहर असल्यामुळे वृक्षारोपणाची नितांत गरज आहे. त्यातच शहरात वृक्ष संपदा खूपच कमी आहे. वृक्षारोपणासाठी महापालिका प्रशासन पातळीवर प्रयत्न होत आहेत. वृक्षतोड करणा-यांवर फौजदारी कारवाई केली जात आहे. असे चित्र असताना थोरात चौकातील वृक्षांची कत्तल होत असताना मात्र कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
---------
वृक्षाचा जीव वाचवण्यासाठी
घाव घातलेल्या वृक्षांचा जीव वाचवण्यासाठी वृक्षप्रेमींची धडपड विचार करण्यास लावणारी आहे. घाव घातलेल्या ठिकाणी शेणखत, मातीचा लेप लावून भोवती सुरक्षीत आच्छादन केले आहे. पाणी देण्याचीही व्यवस्था केली. त्यामुळे या वृक्षाला जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यासाठी राजेश व्यास, रमेश धोत्रे, गोपाल खंडेलवाल, कौशिक मराठे, अशोक पाटणी, स्वप्नील मद्यापगोळ, केदार रेडेकर, सचिन सावंत, उत्तम सुतार, अनिल सोगाणी, राघवेंद्र जाजू, योगेश सुतार यांनी योगदान दिले.
----------
शहरात वृक्षसंपदा कमी आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सामाजिक भावनेतून वृक्षारोपण करण्याचे काम सुरु आहे. थोरात चौकातही सर्व देशी झाडे लावली आहेत. त्याचे संगोपन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. पण काही विघातक प्रवृत्तींकडून या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. अशांवर वेळीच कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. तरच शहरातील वृक्षसंपदा सुरक्षीत राहणार आहे.
-रमेश धोत्रे, वृक्षप्रेमी, व्हीजन इचलकरंजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT