कोल्हापूर

वित्त आयोगाची तालुकास्‍तरीय तपासणी आवश्यक

CD

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

वित्त आयोगाची हवी तालुकास्‍तरीय तपासणी

माहितीची लपवाछपवी होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर,ता.१३: पंचायत समितींना वित्त आयोगाचा निधी दिला जातो. मात्र प्रशासक असल्याने निधी वितरण झालेले नाही. असे असतानाही पन्‍हाळासह अन्य काही पंचायत समितीत निधी वितरण झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीकडील वित्त आयोगाच्या दप्‍तरची तपासणी होणे आवश्यक आहे. यात प्रशासकीय मंजुरी दिलेले रजिस्‍टर, टिप्‍पणी तसेच कार्यारंभ आदेशाच्या माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीची लपवाछपवी होण्याचा संशयही व्यक्‍त केला जात आहे.

राज्यातील बहुतांश स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थात प्रशासक नेमण्यात आले आहेत. जोपर्यंत याठिकाणी लोकप्रतिनिधी येत नाहीत, तोपर्यंत निधी वितरण होणार नसल्याचेच शासन निर्णयात म्‍हटले आहे. जिल्‍हा परिषदेला ४० कोटींचा निधी येणे बाकी आहे. अशीच पंचायत समितीची अवस्‍था आहे. असे असताना पन्‍हाळा पंचायत समितीने मात्र परस्‍पर निधी वितरण केले आहे. हातकणंगले तालुक्यातही काही कामांना प्रशासकीय मान्यता दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुकास्‍तरीय रेकॉर्ड तपासणी आवश्यक आहे. वित्त आयोगासह अन्य योजनांच्या निधी वितरणातही बराच गोंधळ आहे.

...
थेट प्रशासकीय आदेश दिल्याची शक्यता
वित्त आयोगाचा निधी पंचायत समितीस्‍तरावर वितरण करण्यात आला आहे. मात्र हे करत असताना कागदोपत्री प्रक्रिया बाजूला सारुन थेट प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असण्याची शक्यता आहे. कंत्राटदारांकडे काम सुरु करण्याचे आदेश आहेत. मात्र ही सर्व कागदपत्रे पंचायत समितीत असण्याबाबत संशय व्यक्‍त केला जात आहे.
...
पहिले काम नंतर ठराव
सर्व स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांत विकासकामे होत असताना अगोदर कामाची निवड होणे आवश्यक आहे. गावासाठी कोणती कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे, हे निश्‍चित करणे आवश्यक आहे. काम निश्‍चित झाल्यानंतर मग कागदपत्रांची पूर्तता, तांत्रिक बाबी पडताळून निधी वितरण करावे लागते. मात्र सध्याची परिस्‍थिती याउलट आहे. अगदोर काम निश्‍चित केले जाते व त्यानुसार ठराव, कागदपत्रांची जुळवाजुळव केली जाते. हे नियमाला धरुन नाही. या पध्‍दतीत मोठे फेरबदल आवश्यक आहेत.
...
तालुक्यांना २०२२-२३ वर्षासाठी येणारा बंधित*, अबंधित निधी*

तालुका* निधी

आजार* ७५ लाख*
भुदरगड* ६८ लाख ३० हजार*
चंदगड* १ कोटी २९ लाख*
गडहिंग्‍लज* १ कोटी २७ लाख*
गगनबावडा* २९ लाख ८२ हजार*
हातकणंगले* २ कोटी ८३ लाख*
कागल* १ कोटी ५० लाख*
करवीर* ३ कोटी ७ लाख*
राधानगरी* १ कोटी ३८ लाख*
शाहूवाडी* १ कोटी ३४ लाख*
शिरोळ* १ कोटी ८६ लाख*
पन्‍हाळा* १ कोटी ६७ लाख*

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT