कोल्हापूर

डीकेटीई इंग्लिश मेडियमचे यश

CD

डीकेटीई इंग्लिश मेडियमचे यश
इचलकरंजी : ‘मेरी माटी, मेरा देश’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर ‘प्लास्टिक भस्मासुराचा अंत’ या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली. यात डीकेटीई सोसायटी इंग्लिश मीडियमची विद्यार्थिनी वृंदा गोविलकर हिचा (पाचवी ते सातवी) या गटात प्रथम क्रमांक आला. सानिका गोरे हिचा (आठवी ते दहावी) गटात द्वितीय क्रमांक आला. विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक संजय फुले, मुख्याध्यापिका भारती कासार यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------
अशोका हायस्कूलचे यश
इचलकरंजी : जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत अशोका हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी यश संपादन केले. यामध्ये आदित्य जाधव - गोळाफेक प्रथम (१७ वर्षे वयोगट), गौरव वेटाळे - २०० मी. धावणे स्पर्धा- द्वितिय (१४ वर्षे वयोगट) आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका एस. डी. पाटील, क्रीडा प्रशिक्षक उत्तम गडदे यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------
नाट्य परिषद इचलकरंजी प्रथम
इचलकरंजी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईतर्फे आयोजित शाखाअंतर्गत राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये कोल्हापूर जिल्हा विभागात इचलकरंजी शाखेने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचे चौदावे वर्ष आहे. नाट्य परिषद इचलकरंजी शाखेने ‘हा वास कुठून येतोय’ ही प्राजक्त देशमुख लिखित एकांकिका सादर केली. स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट एकांकिका व सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळवला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अनिरुद्ध दांडेकर, अभिनय पुरुष प्रथम क्रमांक- अभिषेक लोले, अभिनय पुरुष द्वितीय क्रमांक- प्रतीक हुंद्रे आणि अभिनय स्त्री द्वितीय क्रमांक- मानसी कुलकर्णी यांनी मिळविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी मिलिंद अष्टेकर, गिरीश महाजन व जितेंद्र देशपांडे आणि परीक्षकांच्या उपस्थितीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT