कोल्हापूर

पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूक करा

CD

ich134.jpg
37626
इचलकरंजी : पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीचे निवेदन दिले.

पुरवठा अधिकाऱ्यांची नेमणूक करा
इचलकरंजीत महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १३ : इचलकरंजी शहर व परिसरामध्ये अनेक कष्टकरी कामगार व गोरगरीब जनतेची संख्या जास्त प्रमाणात आहे. यामधील अनेक केशरी कार्डधारकांना काही वर्षे झाली धान्य मिळत नाही. पुरवठा कार्यालयात पुरवठा अधिकारीच नसल्याने दाद कोणाकडे मागावी. त्यामुळे पुरवठा अधिकारी यांची ताबडतोब नेमणूक करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयामध्ये दिले.
इचलकरंजी शहर हे कामगार वस्तीचे शहर आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत. अशा कष्टकरी व गोरगरीब कामगारांना केशरी कार्डावर पूर्वी धान्य मिळालेले आहेत; परंतु अशा बऱ्याच केशरी कार्डधारकांना सध्या धान्य मिळत नाही. कामगारांना रेशन कार्ड किंवा दाखल्यांसाठी पुरवठा कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. तसेच इचलकरंजी विधानसभा क्षेत्रामध्ये इचलकरंजी शहरास इतर ग्रामीण गावे देखील येतात, तरी या ग्रामीणमधील जनतेची काही कामे इचलकरंजी पुरवठा कार्यालयाकडे येतात. पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा अधिकारी नसल्याने नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठ ते दहा दिवसांत पुरवठा अधिकारी यांची नेमणूक करावी, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Pune Delhi Plane Journey : दिल्लीला चला आता ‘बिझनेस क्लास’ने! पुण्यातून विमानसेवा सुरू; आरामदायक प्रवास; २५ हजारांपासून तिकीट

SCROLL FOR NEXT