कोल्हापूर

विद्यार्थिनीला घेतले दत्तक

CD

gad133.jpg
37659
गडहिंग्लज : लायन्स क्लब व आर. जी. पाटील यांच्यातर्फे स्नेहा सुतार हिला सायकल प्रदान करण्यात आली. याप्रसंगी लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
विद्यार्थिनीला घेतले दत्तक
‘लायन्स’चे दातृत्व : सायकल देऊन थांबवली शिक्षणासाठीची पायपीट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : येथील लायन्स क्लब व माजी अध्यक्ष आर. जी. पाटील यांनी भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील विद्यार्थिनीला शिक्षणासाठी दत्तक घेतले. स्नेहा पांडुरंग सुतार असे या तिचे नाव आहे. स्नेहाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाणार आहे. तसेच तिला सायकल दिल्यामुळे शिक्षणाची पायपीटही थांबली आहे.
स्नेहाच्या वडीलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आई श्रीमती गौरी यांच्यावर आली आहे. दोन मुले व वयोवृद्ध सासूला सांभाळताना त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. स्नेहाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष आर. जी. पाटील यांच्या सहकार्याने क्लबतर्फे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. लायन्सच्या अध्यक्षा दीपाली पट्टणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिला सायकल प्रदान केली. तसेच बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
लायन्सचे माजी प्रांतपाल आण्णासाहेब गळतगे, डॉ. सुभाष पाटील, गुरुराज हत्ती, राजेंद्र वडगुले, सुनील पट्टणशेट्टी, विनायक गळतगे, गौरव देशपांडे, प्रसाद सभासद, प्रतिक पाटील, गौरी सुतार आदी उपस्थित होते. सचिव सविता वडगुले यांनी स्वागत केले. खजिनदार उज्ज्वला मार्तंड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT