कोल्हापूर

संताजी घोरपडे स्मारक

CD

13685
...
कोल्हापूर : सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेऊन स्मारकाबाबत चर्चा केली.
...

संताजी घोरपडे स्मारकाचे
काम मार्चअखेर पूर्ण होईल

पालकमंत्री मुश्रीफः ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ : सेनापती कापशी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम मार्चअखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने स्मारकाचे काम सुरू आहे. त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या सानेगुरूजी वसाहतीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांनी स्मारकावर आजपर्यंत साडेचार कोटी रूपये खर्च झाले असून, संताजी घोरपडे यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यासह सभागृह, ग्रंथालय, चबुतरा याविषयी चर्चा केली.
याप्रसंगी डॉ. पवार यांनी संताजी घोरपडे यांचे मूळ छायाचित्र किंवा त्यावर आधारित पुतळा उपलब्ध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘ संताजी घोरपडे यांचे इतिहासातील स्थान व उपलब्ध चरित्रावरून चेहऱ्यावरील भाव याचा अंदाज घेत पुतळा तयार केला जाईल. तो किशोर पुरेकर घडविणार आहेत. मुख्य म्हणजे औरंगजेबाचा चरित्रकार खाफीखान याने संताजींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ते महान मराठा योद्धा होते.’
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, कागलचे उपअभियंता सी. ए. पाटील, सुनील चौगुले, अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT