कोल्हापूर

मुश्रीफ पत्रपरीषद २

CD

हद्दवाढीबाबत दिवाळीनंतर निर्णय घेऊ
हसन मुश्रीफ ः इचलकरंजीला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी माझी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः ‘कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत दिवाळीनंतर लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ. तसेच इचलकरंजीला शुद्ध पाणीपुरवठा देण्याची जबाबदारी माझी आहे, ती पूर्ण केली जाईल’, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुश्रीफ म्हणाले, ‘कोल्हापूर शहराच्या सुविधांचा लाभ घेणारी नजीकची गावे पहिल्या टप्प्यातील हद्दवाढीत घेणार आहोत. दसरा-दिवाळी सण झाल्यानंतर तेथील लोकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल. नगरपालिका स्थापन झाल्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ येथे मिळलेला नाही. यातून कोल्हापूरचा विकास करणे व ते देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी हद्दवाढीसाठी सगळ्याच घटकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. पुणे, मुंबई, ठाणे शहरांची हद्दवाढ झाली. पुण्यातील हद्दीवाढीनुसार शहरात येण्यासाठी अनेक गावांची स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात गावे समाविष्ट झाल्यास त्याचे कोणते लाभ होतात, सुविधा घेतल्याचे फायदे काय आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे.’

ते पुढे म्हणाले , ‘यापूर्वी इचलकरंजीला दोन-तीन योजना झाल्या आहेत. पाऊस कमी झाला तेव्हा दुधगंगा नदीचे व धरणातील नदीतील पाणी संपले. पिण्याचे पाणी नव्हते, ऊस वाळला असे चित्र ज्या गावात होते. तेथील जनता खडबडून जागृत झाली. आपल्या हक्काचे पाणी दुसऱ्याला देण्यासाठी जनता तयार नाही. इचलकरंजीला कृष्णा नदीच्या शुद्ध पाण्याची योजना आहे. ज्या योजनाची मागणी होत आहे ती योजना होण्यास वेळ लागेल. म्हणून कृष्णा नदीतून मजले गावापासून जी योजना सुरू आहे तेथून पाणी घेऊ त्यासाठी कितीही खर्च आला तरी योजनेद्वारे इचलकरंजीला शुद्ध पाणी देऊ.’

दरम्यान, कोल्हापूरच्या पत्रकारांविषयी येथील जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती पत्रकारांनी मुश्रीफ यांना दिली. तसेच, तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘जिल्हाधिकाऱ्यांनी अशी वक्तव्ये केली असल्यास व ती खरी असल्यास योग्य कारवाई करू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT