कोल्हापूर

आजरा ः सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक बातमी

CD

ajr132.jpg
आजरा ः येथील सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आबिटकर. यावेळी उपस्थित प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर आदी.
...

सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द
आमदार आबिटकर ः आजऱ्यात सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः ‘सर्फनाला प्रकल्पाचे काम गतीने होण्याबरोबर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी कटिबध्द आहे. धोरणात्मक व छोटे- छोटे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाबरोबर बैठकांचे आयोजन केले जात आहे. दर आठवड्याला सर्फनालाबाबत बैठक घेवून आढावा घेतला जाईल’, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये संकेश्वर- बांदा महामार्ग प्रश्नावर बैठक झाली. आमदार आबिटकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, सर्फनाला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर प्रमुख उपस्थित होते.
रामलिंग मंदिर हे जंगलात असल्याने त्याची नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही, असे प्रांताधिकारी बारवे यांनी सांगितले. यावर कॉ. संपत देसाई यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘वनहक्काच्या कायद्याने मंदिर हे ग्रामस्थांच्या मालकीचे असून त्याची नुकसान भरपाई देता येते.’ यावर श्रीमती बारवे यांनी संमती दर्शवली. ‘सर्फनाला प्रकल्पामध्ये तिसरे गावठाण आंबाडे येथे मंजूर करावे. यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेती कसणे सहज शक्य होईल,’ असे कॉ. देसाई यांनी सांगीतले. यावर बारवे यांनी हरकत घेतली. पुनर्वसनाच्या आराखड्यात तिसरे गावठाण नसल्याचे सांगितले. कॉ. देसाई म्हणाले, ‘आठ किलोमीटरच्या आत चित्री प्रकल्पग्रस्तांसाठी चित्रानगर, आवंडी व रायवाडा ही गावठाणे वसवली आहेत. याची माहीती प्रशासनाने घ्यावी. पुनर्वसनाच्या आराखड्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिसऱ्या गावठाणाबाबत प्रशासन मार्ग काढू शकते.’ आमदार आबिटकर यांनी प्रकल्पग्रस्तांना विश्वास घेवून प्रकल्पाचे काम मार्गी लावू, असा विश्वास दिला. यावेळी गोविंद पाटील, अशोक मालव, सुरशे मिटके, संतोष पाटील, प्रकाश शेटगे, पुंडलिक शेटगे यांनी सूचना मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT