कोल्हापूर - शाही दसरा सोहळ्यात सोमवारी शमीपूजन करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे. 
कोल्हापूर

दसरा चौकात आज शाही दसरा सोहळा, पालखी मार्गावर बारा ठिकाणी भव्य कमानी

CD

४०७९८
कोल्हापूर : दसरा चौकातील सीमोल्लंघन सोहळ्याच्या तयारीची पाहणी सोमवारी सायंकाळी करताना युवराज संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित.

दसरा चौकात आज
शाही दसरा सोहळा
पालखी मार्गावर बारा ठिकाणी भव्य कमानी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२३ ः येथील शाही दसरा सोहळ्याला यंदा शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा उद्या (मंगळवारी) पारंपरिकतेचा बाज कायम ठेवत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. परंपरेप्रमाणे सूर्यास्तावेळी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी दसरा चौकात सोहळा होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले आहे.
परंपरेप्रमाणे साडेपाचच्या सुमारास श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई देवीबरोबरच गुरुमहाराज वाड्यातील पालख्यांचे दसरा चौकाकडे प्रस्थान होईल. पालख्या येताच नवीन राजवाड्यावरून मेबॅक गाडी आणि लवाजम्यासह छत्रपती परिवाराचे आगमन होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्री अंबाबाईची पालखी सिध्दार्थनगर मार्गे पुन्हा मंदिरात जाईल. परिसरात करमणुकीची साधने आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी हजेरी लावली असून येथे जत्राच भरणार आहे.

पारंपरिक वाद्यांचाही थाट
पालखीसोबत पारंपरिक लवाजम्यासह ध्वजवाहक घोडा, दहा घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी (अब्दागिरी), त्यानंतर ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक, २०० पैलवान, चार उंट असाही लवाजमा असणार आहे. ढोलपथक, लेझीम व धनगरी ढोल पथकांचाही सहभाग असेल. नवीन राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे पथक स्वागताला उभे राहणार आहे. शाही मिरवणुकीच्या दोन्ही मार्गांवर फुलांचा सडा, रांगोळ्या सजणार असून भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर पारंपरिक पद्धतीने बारा स्वागत कमानी उभारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT