MLA Jayant Asgavkar 
कोल्हापूर

Education Department: तर गंभीर परिणामास आपण जबाबदार राहाल.. शिक्षक आमदार आसगावकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

आमदार आसगावकर शालार्थ आयडीसाठी करणार आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः शिक्षकांना शालार्थ आयडी मिळायला नको म्हणून अधिकारी जाणून-बुजून दिरंगाई करत आहेत. त्यांचा याबाबतचा निष्काळजीपणा भयंकर आहे. या आयडीचा प्रश्नी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सोमवार (ता. ३०) पासून पुणे येथील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टप्पा अनुदानावरील शिक्षकांना लवकर शालार्थ आयडी मिळवून त्यांची यंदाची दिवाळी गोड हवी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र शिक्षण विभागातील अधिकारी याप्रश्नी सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांच्याकडून याप्रश्नी चालढकल होत आहे. शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या १३ जूनच्या आढावा बैठकीत प्रलंबित शालार्थ आयडीचे प्रकरणे तीन आठवड्यात निकाली काढण्याचे ठरले होते. पण, शालार्थ आयडी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलन काळात होणाऱ्या गंभीर परिणामास आपण जबाबदार राहाल असे पत्र आमदार आसगावकर यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT