Sanket Chavan Prasad Sashet win Maharashtra Kesari selection test wrestling tournament sakal
कोल्हापूर

Maharashtra Kesari: तिसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात, पैलवानांच्या भुवया उंचावल्या

तिसऱ्या स्पर्धेच्या घोषणेने भुवया उंचावल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती; पुणे जिल्ह्यात आयोजन

CD

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : यंदा दोन नव्हे तर तिसरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात होत असल्याने पैलवानांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्य कुस्तीगीर परिषदेने काही महिन्यांपूर्वी धाराशिव येथे स्पर्धेची घोषणा केल्यानंतर पुन्हा भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र केसरीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे प्रतिष्ठेच्या गदेचा खेळखंडोबा सुरू असल्याची भावना कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र केसरीची घोषणा केली. त्यांनी पुण्यातील कोथरूड येथे जानेवारी-२०२३ ला झालेले महाराष्ट्र केसरीचे मैदान अनधिकृत असल्याचे म्हटले. त्यानंतर धाराशिवमधील मैदानासाठी विविध जिल्ह्यांत निवड चाचणीचे आयोजनही करण्यात आले. भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानेही ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान फुलगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथे मैदान घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी रेसलिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूरतर्फे नुकतीच नंदगाव येथे निवड चाचणी घेण्यात आली.

जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करून त्यावर अस्थायी समिती नेमली असताना, हे मैदान अधिकृत की अनधिकृत, असा प्रश्‍न कुस्ती क्षेत्राला पडला आहे. पैलवानांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

‘ते’ मैदान गेल्या वर्षीचे...
भारतीय कुस्ती महासंघाने कोथरूडमध्ये जानेवारीत कुस्ती मैदान घेतले. ते मैदान नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ चे होते. ते घेण्यास उशीर झाल्याने जानेवारी २०२३ ला झाले. महासंघातर्फे यंदा पुन्हा जाहीर झालेले मैदान २०२३ चे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कुस्ती शौकीनांत मात्र चर्चेला उधान आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT