कोल्हापूर

हृदयरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद

CD

ich316.jpg
42265
इचलकरंजी ः हृदयरोग तपासणी शिबिरात रुग्णाची तपासणी डॉ. कृष्णकुमार धूत यांनी केली. यावेळी प्रकाश आवाडे, नितीन धूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हृदयरोग तपासणी शिबिराला प्रतिसाद
इचलकंरजीत माहेश्वरी सभेतर्फे आयोजन ः ८६० रुग्णांनी घेतला लाभ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.३१ ः कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा व दगडूलाल मर्दा सीएसआर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मोफत हृदयविकार तपासणी शिबिराला रुग्णांचा प्रतिसाद मिळाला. शिबिराचा ८६० रुग्णांनी लाभ घेतला. त्यांच्या विविध चाचण्या केल्या. अलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला.
मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड व आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. लक्ष्मीकांत मर्दा, श्यामसुंदर मर्दा, नंदकिशोर भूतडा, डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, डॉ. एस. पी. मर्दा यांची प्रमुख उपस्थिती होती. महेश सेवा समिती येथे हे शिबिर झाले. आमदार आवाडे यांनी अशा शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळत असल्याचे नमूद केले.
शिबिरात डॉ. कृष्णकुमार धूत, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. रोहन सोनवणे, डॉ.अमोल भोरे, डॉ. अमित जोशी, डॉ.सम्युवेल भंडारे, डॉ. सी. पी. पाटील, डॉ.अमृता शिदें यांनी तपासणी केली. शिबिरात रक्त तपासणी, ईसीजी, बीएमआय, लिपिड प्रोफाइल, टीएमटी व अँजिओग्राफी मोफत केले. शिबिराचा समारोप चंदनमल मंत्री, नितीन धूत, राधेश्याम भूतडा यांच्या उपस्थीतीत झाला. मदन गोरे, मुकेश खाबाणी, आनंद बांगड, रामगोपाल मालाणी, शातिंकिशोर मंत्री, बजरंग काबरा, बालकिशन टुवाणी, शिवप्रसाद तापडिया, मनोज राठी, रसिक आगीवाल आदी उपस्थीत होते. स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत यांनी केले. हृदयविकार तज्ञांची वेळीच तपासणी आणि औषधोपचार व्हावेत, यासाठी हे शिबीर आयोजीत केल्याचे सांगीतले. सूत्रसंचालन लालचंद गट्टाणी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT