कोल्हापूर

निर्बिजीकरण करा

CD

42520
कोल्हापूर : शहरातील मोकाट कुत्र्यांबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत भाजपचे राहुल चिकोडे, विजय जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आदी.

मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण
पालिकेने १०० दिवसांत करावे
भाजपची मागणी; अधिकारी धारेवर, आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर, ता. १ : शहरातील मोकाट कुत्र्यांचे १०० दिवसांत निर्बिजीकरण करा; तसेच याबाबतच्या प्रश्‍नांची दहा दिवसांत उत्तरे द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपने आज महापालिका प्रशासनाला दिला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनेक प्रश्‍नांवर निरूत्तर केले.
गेल्या आठवड्यात उपायुक्त, संबंधित खातेप्रमुखांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्‍वासन प्रशासकांनी भाजप शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत ही बैठक कशाबाबत आहे, याची कनिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याची बाब दिसून आली.
भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांनी आम्ही लेखी दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे आणली नाहीत, असा सवाल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना केला. या विषयात महापालिका अपयशी ठरली असून, निर्बिजीकरणाबाबत सखोल चौकशी होऊन पाटील यांच्यावर कोणती कारवाई करणार? प्रश्‍नांचा खुलासा किती दिवसात होणार, असे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना विचारण्यात आले. मोकाट कुत्री हिंस्र बनत असून, कोणाचेच लक्ष नाही. इतर राज्यांत कुत्र्यांचे शंभर टक्के निर्बिजीकरण होत असेल, तर शहरात पूर्णत्वास का जात नाही, हा संशोधनाचा विषय असल्याचेही चिकोडे यांनी सांगितले. डॉ. कापडी व बदी यांनी अधिकाऱ्यांना निरुत्तर केले. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी डॉग स्कॉडचे नंबर महापालिकेने प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. या वेळी अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, राजसिंह शेळके, रूपाराणी निकम, उमा इंगळे, संतोष भिवटे, अनिल कामत, विजय आगरवाल यांनी अधिकाऱ्यांना प्रश्‍न करून निरुत्तर केले. डॉ. पाटील यांनी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया १०० दिवसांत पूर्ण करण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. भाजपने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दहा दिवसांत दिली जातील, असे सांगितले. पुढील बैठकीत अधिकाऱ्यांनी माहितीसह उपस्थित रहावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा चिकोडे यांनी दिला. संजय सावंत, सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अजिंक्य चव्हाण, विराज चिखलीकर, दीपक जाधव, गणेश देसाई, माधुरी नकाते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT