कोल्हापूर

सेवा नाकारणाऱ्यांना रुग्णालयांवर कारवाई करा

CD

सेवा नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघातर्फे वैद्यकीय प्रशासन अधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना, इचलकरंजी व यड्राव येथील वैद्यकीय सेवा सुरळीत करावी. विमा सोसायटी यांनी नेमलेल्या खासगी रुग्णालयांनी सेवा बंद केल्या आहेत, त्या सुरू कराव्यात व जी रुग्णालये सेवा देणे नाकारत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघातर्फे वैद्यकीय प्रशासन अधिकारी राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये दिले.
इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुका येथे औद्योगिक वसाहती असल्याने कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामधील बहुतांश कामगार हे राज्य कामगार विमा सोसायटी योजनेला जोडले आहेत. कामगारांच्या पगारामधून ईएसआय योजनेतील कपात दर महिन्याला केली जाते. कपात केलेली रक्कम विमा सोसायटीकडे जमा केली जाते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ईएसआय वर्गणी करोडो रुपयांची आहे. असे असतानाही कामगारांना वैद्यकीय सेवा मिळताना दिसत नाही. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्थानिक विमा दवाखान्यांमधून औषधेही वेळेत मिळत नाहीत. औषधे बाहेरुन घ्यावी लागतात. कामगारांनी सादर केलेली बिलेही वेळेत मिळत नाहीत. अशातच विमा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयांनी कामगारांना सेवा देणे बंद केले आहे. तसे फलकही काहींनी लावले आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तत्काळ मार्ग काढावा, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात प्रकाश कामरे, सुरेश पाटील, सुनील बारवाडे, अतुल दिघे, रवींद्र लाटकर, वसंत आपटे सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT