कोल्हापूर

गड-साखळी उपोषण स्थगीत

CD

गडहिंग्लजचे साखळी उपोषण स्थगित

गडहिंग्लज, ता. ३ : मराठा आरक्षणासाठी येथील सकल मराठा समाजातर्फे सुरु असलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समाजातील सर्व घटकांचे सकल मराठा समाजातर्फे आभार मानण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील सकल मराठा समाजातर्फेही सोमवारपासून (ता.३०) साखळी उपोषण सुरु केले. दरम्यान, शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यांना प्रतिसाद म्हणून २ जानेवारीपर्यंतची मुदत देत जरांगे-पाटील यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. त्यामुळे येथील साखळी उपोषणही तात्पुरते स्थगित करण्यात आले. मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समाजातील सर्व घटकांचे आभार मानले.
आजही आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन, जैन समाजाने पाठिंबा दिला. इंचनाळ ग्रामस्थांनी मोटरसायकल रॅलीने आंदोलनस्थळी येत पाठिंबा दिला. प्रसाद पाटील, सोहन होडगे, प्रदीप पोवार, गजानन आर्दाळकर, प्रा. सुनील शिंत्रे, वसंतराव यमगेकर, सुधीर उर्फ आप्पा शिवणे, शिवाजी कुराडे, युवराज बरगे, संजय पाटील, प्रकाश पाटील, अमर चव्हाण, सचिन देसाई यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT