कोल्हापूर

संशोधकांना मिळणार जनगणनेतील मूलभूत माहिती

CD

42942
...
संशोधकांना मिळणार
जनगणनेतील मूलभूत माहिती

डॉ. निरूपमा डांगेः शिवाजी विद्यापीठातील कार्यकेंद्राचे उदघाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘शिवाजी विद्यापीठातील जनगणना माहिती कार्यकेंद्रामध्ये दर्जेदार संशोधन व्हावे. त्या माध्यमातून प्रशासनाला धोरणे निश्चित करण्यासाठी योग्य दिशादर्शन व्हावे’, अशी अपेक्षा जनगणना कार्य संचालनालयाच्या (महाराष्ट्र) संचालक डॉ. निरुपमा डांगे यांनी आज येथे व्यक्त केली.
विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात संचालनालयाच्या जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राची स्थापना केली आहे. या अनुषंगाने विद्यापीठासमवेत सामंजस्य करार आणि कार्यकेंद्राचे औपचारिक उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. डांगे म्हणाल्या, ‘जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती ही अत्यंत मूलभूत असते. तिची गोपनीयता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली तरी संशोधकांना ही माहिती उपलब्ध करून देऊन देशाला दिशादर्शक अशी धोरणे आखण्यासाठी तिचा अतिशय उत्तम वापर करता येऊ शकतो.’
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘सामंजस्य करार दूरगामी उपयुक्त स्वरुपाचा ठरेल. जनगणना कार्य संचालनालयासमवेत झालेल्या या सामंजस्य करारामुळे जनगणनेसारख्या अत्यंत मूलभूत माहितीच्या विश्लेषणावर संशोधकांना काम करता येणे शक्य होणार आहे. संचालनालयानेही काही संशोधनात्मक प्रश्न सुचवावेत, म्हणजे त्यांनाही आवश्यक ते विश्लेषण येथूनच करून देता येईल.’
यावेळी संचालनालयाविषयी वरिष्ठ अधिकारी ए.एन. राजीव यांनी सादरीकरण केले. सामंजस्य करारावर संचालनालयातर्फे डॉ. डांगे यांनी, तर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी व्ही.ए. अहिरे, वाय. एस. पाटील, किरण गुरव, प्रवीण भगत, डॉ. श्रीकृष्ण महाजन, महादेव देशमुख, सरिता ठकार, प्रकाश पवार, अभिजीत रेडेकर उपस्थित होते. डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.
...
संशोधन कार्यकेंद्र असे ...
‘विद्यापीठातील या संशोधन केंद्रातील सुविधांचा लाभ विद्यापीठासह बाहेरील संशोधकांना घेता येणार आहे. माहिती घेण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी संगणक, प्रिंटर आणि सांख्यिकीय विश्लेषणासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत’, अशी माहिती संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. महाडिक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! पगार अन् पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ, पुढील आठवड्यात सरकार करणार घोषणा ?

Dharashiv News: २५% अटीत अडकली दहिफळची दारूबंदी चळवळ!; महिलांचा निर्धार ठाम.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

SCROLL FOR NEXT