कोल्हापूर

पाच शासकीय विद्यानिकेतनचा आजपासून महामेळावा

CD

पाच शासकीय विद्यानिकेतनचा
आजपासून महामेळावा

कोल्हापूर ः राज्यातील विविध पाच शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांच्या महास्नेहमेळावाचे उदघाटन रामकृष्ण हॉलमध्ये उद्या, शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. पुसेगाव, छत्रपती संभाजीनगर, चिखलदरा, धुळे, केळापूर येथील शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुसेगाव विद्यानिकेतनने आयोजित केला आहे. या पाचही विद्यानिकेतनचा सर्वांगीण कायापालट करण्याच्या उद्देशाने सर्व माजी विद्यार्थी संघटित होत आहेत. ते विद्यानिकेतनांना मदतीचा हात देणार आहेत. मेळाव्यासाठी राज्यभरातील काही विद्यार्थी आज कोल्हापुरात आले. त्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. त्यांची नोंदणी करण्यात आली. मेळाव्याचे उदघाटन शनिवारी या विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनराज गरड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्मरणिका प्रकाशन, माहितीपटाचे प्रदर्शन आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. रविवारी (ता.५) माजी विद्यार्थी संघटनेबाबत चर्चा, आजी-माजी प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक अतुल मंडपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT