कोल्हापूर

पाणीपुरवठा

CD

42992

सी, डी वॉर्डमध्ये पाणीटंचाई तीव्र
कोल्हापूर, ता. ३ ः बालिंगा केंद्राच्या चॅनेलचे काम सुरू झाल्यानंतर आज सी, डी वॉर्डमधील पाणी टंचाई तीव्र झाली. त्यामुळे १८ टॅंकरच्या २५ फेऱ्यांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. नागदेववाडी उपसा केंद्र सुरू असल्याने काही भागात कमी दाबाने तरी पाणी आले.
चॅनेलमधील मलबा काढण्यासाठी आज प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने बालिंगा उपसा केंद्र दुपारपासून बंद ठेवावे लागले; पण नागदेववाडी येथील केंद्र सुरूच ठेवून त्यातून मिळणारे पाणी चंबुखडीद्वारे शहरातील काही भागात पाठवले जात होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी येत होते. उर्वरित सी, डी वॉर्डमध्ये मात्र टंचाई तीव्र झाली. अनेकांनी चार दिवस पाणी येणार नाही म्हणून कालच मिळेल त्या साहित्यात टॅंकरद्वारे मिळालेले पाणी भरून ठेवले होते. त्यामुळे आज तुलनेने टॅंकरची मागणी कमी झाली. तसेच टॅंकरची संख्याही वाढवून १८ करण्यात आली. या टॅंकरकडून मध्यवस्तीच्या भागात २५ फेऱ्या करण्यात आल्या. त्याचे पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती.
शहराच्या दाटवस्तीत पाण्याची गरज भासत आहे. तेथील गल्लीबोळातील नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅंकरमधून पाणी भरावे लागत असल्याने काही ठिकाणी महापालिकेबाबत राग व्यक्त केला जात आहे. दुपारी सुरू झालेले काम आणखी दोन दिवस सुरू राहील असे सांगण्यात येत आहे. तोपर्यंत नागदेववाडी केंद्रातून काही प्रमाणात पाणी दिले जात आहे. थेट पाईपलाईनचे पाणीही लवकर देण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. शहरातील इतर भागात मात्र व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT