कोल्हापूर

अंबाबाई मंदिर

CD

फक्त फोटो व ओळ पट्ट्यात टॉपला- 44566
...............

44567
...
दुसऱ्या दिवशीही
ढगांचा अडथळा कायम

अंबाबाई मंदिर किरणोत्सवाचा दुसरा दिवस

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण होवू शकला नाही. किरणोत्सव अभ्यासकांच्या अभ्यासानुसार आज मुर्तीच्या कमरेपर्यंत मावळतीची सूर्यकिरणे येणे अपेक्षित होते. पण, वातावरणच ढगाळ असल्याने भाविकांची निराशा झाली.
गेली काही वर्षे देवस्थान समितीच्या वतीने पाच दिवस किरणोत्सव सोहळा होतो. त्यानुसार कालपासून या सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. अधिकाधिक भाविकांना हा सोहळा अनुभवता यावा, यासाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, काल पहिल्या दिवशी किरणे पितळी उंबऱ्यापर्यंतच पोचली आणि आज तर पूर्णच ढगाळ वातावरण राहिले.
..........
44601
श्री अंबाबाई चरणी
एक कोटी ३६ लाखांचे दान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देणगी पेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली. गेली पाच दिवस मंदिरात दानपेट्यांची मोजणी सुरू होती. बारा पेट्यांतून एक कोटी ३६ लाख ६२ हजार १९६ रुपये इतकी रक्कम जमा झाली. त्यामध्ये रोख रक्कमेसह सुट्या नाण्यांचाही समावेश आहे. काही दागिनेही पेट्यांत मिळाले असून त्याचे स्वतंत्रपणे मूल्यांकन केले जाणार आहे.
अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. नवरात्रोत्सवापासून तर ती आणखीनच वाढली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता देवस्थान समितीकडून महिन्यातून एकदा दानपेट्या मोजणीसाठी उघडल्या जातात, असे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

SCROLL FOR NEXT