तोंडाला रुमाल बांधलेले
चोरटे सीसीटीव्हीत कैद
गडहिंग्लजमधील चोऱ्यांत चौघांच्या टोळीची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ ः शनिवारी (ता. २५) सकाळी उघडकीला आलेल्या शहरातील चोऱ्यांमधील चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. परंतु तोंडाला रुमाल बांधलेल्या या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तिघा किंवा चौघांची ही टोळी असण्याची शक्यताही दाट आहे.
शनिवारी (ता. २५) आनंद विहारमधील दोन तर त्यामागील एका घरातील चोरी उघडकीस आली. दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. एका फ्लॅटमधून साडेचार लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. तत्पूर्वी, हे चोरटे संकल्पनगरातील एका तीन मजली इमारतीतील भाडेकरूंच्या दोन खोल्यांचा कडीकोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार या इमारतीच्या पोर्चला जाळी आहे. त्याला दरवाजा असला तरी कुलूप नसते. बाहेरूनच हात घालून चोरट्याने कडी काढली आणि पोर्चमध्ये ठेवलेले घरमालकाचे हेल्मेट घालूनच तो पोर्चच्या आत आला. त्याच्या हातात कटावणी, तोंडाला कापड बांधलेले दिसते. शेजारच्या खोलीत रहिवाशी असल्याचे लक्षात येताच त्या रूमच्या दरवाजाला तो बाहेरून कडी लावतो. काही वेळातच तोंडाला रुमाल व ऑरेंज कलरची टोपी घातलेला त्याचा दुसरा साथीदार आत येतो. त्यानंतर बंद असलेल्या दोन्ही खोल्यांचे कडीकोयंडा उचकटून त्यांनी आत प्रवेश केला. परंतु याठिकाणी त्यांना काहीच हाती लागत नाही हे समजल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारच्याच आनंद विहारकडे वळवल्याचे सीसीटीव्हीत दिसते. सीसीटीव्हीतून ऐकू येणारे संभाषण व बाहेरच्या हालचालीवरून ही टोळी तिघा किंवा चौघांची असण्याची शक्यता आहे.
...
‘ते’ भाडेकरू...महिला तलाठी
विशेष म्हणजे या चोरीच्या साखळीत चोरट्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याचे दिसते. पहिल्यांदा महिला पोलिस कर्मचारी, त्यानंतर महिला सरकारी वकीलांच्या घरात चोरी केली. त्यानंतर संकल्पनगरातील इमारतीत ज्या दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला, त्या खोलीमध्ये महिला तलाठी भाडेकरू असल्याचे कळते. सलग तीन दिवस सुट्या असल्याने त्या लॅपटॉप व इतर साहित्य खोलीत ठेवूनच गावी गेल्या होत्या. मात्र चोरट्यांनी या लॅपटॉपना हातसुद्धा लावला नाही. किमती ऐवज, रोकड न मिळाल्याने चोरट्यांनी मोर्चा दुसरीकडे वळवल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.