47790
समर्थ पांढरबळेचा सत्कार
कोल्हापूर ः नानासाहेब गद्रे हायस्कूलचा विद्यार्थी समर्थ पांढरबळेने स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल (एसी विभागातर्फे) राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कळंबा कारागृहाचे उपअधीक्षक रावसाहेब आडे, ‘एसी’चे पश्चिम महाराष्ट्राचे अधिकारी विनायक गायकवाड यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. यावेळी डॉ. मॅडी तामगावकर, डॉ. प्रतीक मुणगेकर, शिवराज पाटील, शैलजा डुणुंग उपस्थित होते.
--
47771
संजय जिरगे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
कोल्हापूर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या जिल्हा कार्यकारिणीवर उपाध्यक्षपदी संजय जिरगे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, राज्य सचिव मंगलराव माळगे, राज्य सचिव बी. के. कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, प्रदीप मस्के, सतीश माळगे उपस्थित होते.
--
47769
राजेंद्र ओंकार यांची निवड
कोल्हापूर ः शनिवार पेठेतील राजेंद्र हणमंत ओंकार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक संरक्षण समितीच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई येथील पक्ष कार्यालयात समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीसाठी शहर अध्यक्ष आर. के. पोवार व जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
--
जिल्हास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शन शुक्रवारी
कोल्हापूर ः विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे कोल्हापूर जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषद प्रकल्प सादरीकरण शुक्रवारी (ता.१) सकाळी दहा ते पाच या वेळेत होईल. कदमवाडी येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये हे प्रदर्शन होईल. या प्रदर्शनात प्रत्येक शाळेने दोन संशोधन प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे. लहान व मोठ्या गटात सादरीकरण होईल. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक एम. बी. मुडबिद्रीकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.