महापालिका लोगो
--
फोटो47956
--
डांबरी प्रकल्पासाठी तारीख पे तारीख
अजूनही अंतिम मंजुरी नाही; रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी गरज अधोरेखित
कोल्हापूर, ता. २८ ः नवीन रस्ते करण्यासाठी निधी लवकर उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पॅचवर्क करण्यासाठी डांबरी प्रकल्प आवश्यक असतानाही तो साकारण्यासाठी दीड वर्षांपासून महापालिकेकडून केवळ तारीख पे तारीख सुरू आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास पॅचवर्कचे ठेके देणे बंद होणार आहे. त्यामुळे ही दिरंगाई सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेला शहरातील सर्व रस्ते करणे निधीअभावी शक्य होत नाही. त्यासाठी शासनाच्या निधीची वाट पाहावी लागते. त्यातून काही रस्ते करत वाटचाल सुरू आहे. त्यातून मुख्य रस्ते केले जातात. त्याशिवाय अनेक रस्ते असे आहेत की त्यावरून नेहमी वर्दळ असते. पण, त्यांच्या दुरुस्तीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी पॅचवर्क हा पर्याय असून, पूर्ण रस्त्यासाठी निधी नसल्याने त्यावर तहान भागवली जाते. महापालिकेकडे असलेला डांबरी प्रकल्प बंद पडल्याने ठेकेदारांकडून काम करून घ्यावे लागत आहे. त्यासाठीही निधी खर्च होतो. महापालिकेचा प्रकल्प असल्यास तयार डांबरी, खडी उपलब्ध होऊन जिथे खड्डे असतील तिथे पॅचवर्क करणे सोपे होणार आहे. यातून अनेक रस्त्यांची देखभाल होऊन ते लवकर खराब होणार नाहीत.
यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रकल्प सुरू करण्याचे महापालिकेत केवळ सांगितले जात आहे. त्याच्या अभ्यासावर बराच कालावधी गेला. त्यानंतर नवीनच प्रकल्प बसवण्याचे ठरले. त्यासाठी एक कोटी १५ लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले. कचरा प्रक्रिया प्रकल्पाजवळील जागा ठरवली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन महापालिकेने दिले होते. पण, अजूनही जागेची निश्चिती झालेली नाही, अशी स्थिती आहे. जागा ठरवून प्रशासकांची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर तातडीने प्रकल्प राबवला जाईल, असे सांगितले जात आहे, पण आतापर्यंतची गती पाहता पुढील पावसाळ्यापर्यंतही तो साकारला जाईल, याची शक्यता कमी दिसत आहे.
चौकट
प्रकल्प साकारल्यास फायदाच
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यासाठी कर्मचाऱ्यांची तजवीज करणे फार मोठी बाब नाही. त्यातून जे रस्ते लवकर करता येणार नाहीत, त्यांचे पॅचवर्क करता येणार आहे. त्यामुळे ते खराब होणार नाहीत. नागरिकांना किमान चांगले रस्ते देण्याचे काम या प्रकल्पातून होणार आहे.
कोट
जागांचे निश्चितीकरण केले जात आहे. निधीची तरतूद आहे. प्रशासकांची मंजुरी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाईल. निविदेनंतर महिन्यात प्रकल्प साकारला जाऊ शकतो.
ःः-हर्षजित घाटगे, शहर अभियंता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.