47847
...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा
किसान मोर्चाचे बिंदू चौकात धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी- शेतमजुरांना संपूर्ण कर्जमाफी करावी, पीक विमा कंपन्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्यासाठी बंधन घालावे, यासह विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती व संयुक्त समिती किसान मोर्चा यांच्या वतीने आज बिंदू चौकात महाधरणे आंदोलन करण्यात आले.
संविधान दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून कामगार कर्मचारी संघटनांनी देशभर धरणे आंदोलनांची हाक दिली होती. त्याचाच भाग म्हणून येथेही धरणे आंदोलन झाले. यात शासकीय कर्मचारी संघटना पदाधिकारी, कामगार डाव्या पक्षांचे पदाधिकारी नेते सहभागी झाले.
केंद्र व राज्य सरकार जातिधर्माच्या नावाखाली जनतेला झुलवत आहे. यातून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. श्रमिकांचे जगणे धोक्यात येत आहे. अशा स्थितीत संघटनेने धरणे आंदोलनाद्वारे केलेल्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा आंदोलकांनी यावेळी केली.
या आंदोलनात सर्व श्रमिक संघ, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, सेंटर फॉर ट्रेड युनियन (सिटू), ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस, अखिल भारतीय किसान सभा यांचे पदाधिकारी सहभागी झाले. यात शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल लवेकर, कॉ. उदय नारकर, भाकपचे सचिव सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष जाधव, बाबूराव कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.