chd281.jpg
47907
चंदगड : नगराध्यक्षा प्राची काणेकर, चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष बाबू हळदणकर आदी मान्यवरांच्या हस्ते चषक स्वीकारताना शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाचे खेळाडू.
---------------------------
शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघ विजेता
चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धा ः प्रोग्रेस क्लब द्वितीय, युवा स्पोर्ट्स तृतीय
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ : येथील चंदगड अर्बन बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाने विजेतेपद पटकावले. प्रतिस्पर्धी प्रोग्रेस क्लब संघावर ४४ धावांची आघाडी घेत त्यांनी चषकावर शिक्कामोर्तब केले. प्रोग्रेस क्लबला द्वितीय, युवा स्पोर्ट्सने तृतीय तर रेणुका फाउंडेशन संघाने चौथा क्रमांक पटकावला.
येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुमारे दोन आठवडे स्पर्धा चालल्या. नगराध्यक्षा प्राची काणेकर, बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष बाबू बाळा हळदणकर यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व बक्षिसाची रक्कम प्रदान केली.
अंतिम सामन्यात शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाने १२ षटकात नऊ गडी बाद करून ११२ धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना प्रोग्रेस क्लबला आठ षटकात सर्व गडी बाद ६८ धावा करता आल्या. शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाने ४४ धावांची आघाडी घेत अंतिम विजेतेपद पटकावले. स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेळगाव, बांदा, निपाणी, कोणाळकट्टा आदी विभागातून ३२ संघ सहभागी झाले होते. दोन आठवडे स्थानिक व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरली. हिदायत नाईक व जोतिबा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. जमीर आगा व राजा नाईक यांनी उत्कृष्ट समालोचन केले. संजय चंदगडकर, विनायक पिळणकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------
वैयक्तिक बक्षीसे
मॅन ऑफ दी मॅचचा बहुमान शिवाजीराव पाटील ज्वेलर्स संघाचा खेळाडू आशिष बेहरोल याने पटकावला. याच संघाच्या किरण पवार याने उत्कृष्ट फलंदाज तर प्रोग्रेस क्लबचा सोहेल शेख उत्कृष्ट गोलंदाज व राजा शर्मा मॅन ऑफ द सिरीज ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.