अवयवदान, देहदान
चळवळीची बदनामी नको
ऑर्गन अँड बॉडी डोनेशन फेडरेशनचे निवेदन
कोल्हापूर, ता. २८ ः अनेक प्रयत्नानंतर अवयवदान आणि देहदान चळवळ आता कुठे व्यापक होवू लागली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी कर्जफेडीसाठी थेट रस्त्यावर उतरुन अवयव विक्री करण्याची वक्तव्ये सुरू केली आहेत. त्यामुळे अवयवदान व देहदान चळवळ बदनाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने याची तत्काळ दखल घेवून चळवळीला बाधा पोचणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन ऑर्गन अँड बॉडी डोनेशन फेडरेशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही ठाण मांडून आमचे डोळे, किडनी, लिव्हर असे अवयव काढून त्यांच्यासमोर विक्री करू आणि कर्ज फेडू, अशा प्रकारची वक्तव्ये करत काही शेतकरी मुंबईकडे निघाले असल्याचे व्हिडिओ सर्वत्र शेअर होवू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत संभ्रम व गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. अवयवदान, देहदान कायद्यानुसार अवयवांची विक्री करणे कायद्यानुसार गुन्हा असल्याचेही फेडरेशनचे जिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.