कोल्हापूर

सुरुतेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला विमान प्रवास

CD

chd282.jpg
47923
गोवा ः विमान प्रवासाने सहलीत सहभागी झालेले सुरुते शाळेचे विद्यार्थी.
----------------------
सुरुतेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला विमान प्रवास
सहलीच्या इतिहासात नवा पायंडा ः शाळा समिती, पालकांच्या पुढाकारातून सहल यशस्वी
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ ः गावानजीकच्या आकाशात काहीसे मोठ्ठे दिसणारे विमान पाहून त्यांच्या भावनांना अंकुर फुटायचे. आपल्यालाही कधीतरी विमानात बसायला मिळेल का असा प्रश्न बालमनाला पडला नसेल तरच नवल. सुरुते (ता. चंदगड) येथील मराठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी हे जाणले आणि शाळेतील २१ विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवला. उन्हाळी सहलीचे नियोजन केले ते थेट विमान प्रवासाने. चार दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांनी गोव्यातून उड्डाण घेतले आणि हैदराबादमधील विविध पर्यटनस्थळांची पाहणी करुन परतले.
सुरुते हे कर्नाटक सीमेवरील गाव. गावाच्या एका बाजूला सांबरा तर दुसऱ्या बाजूला मोपा व गोव्याचे विमानतळ. देशी आणि आंतरराष्ट्रीय सेवा देणारी विमाने या विमानतळावर उतरताना याच भागात जमिनीपासून जवळ येतात. त्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा येथून त्यांचा आकार काहीसा मोठा दिसतो. त्याच्या गतीबरोबर बघणाऱ्याचे मनही कल्पनेच्या आकाशात भरारी घ्यायला लागते. विशेषतः लहान मुलांच्या भावना वेगाने दौडू लागतात. विमान प्रवास करायचा असा निश्चय करणाऱ्यांपैकी काहींचेच स्वप्न पूर्ण होते. बुहतेकांना तशी संधीच मिळत नाही. नेमकी हीच बाब ओळखून सुरुते येथील शाळा व्यवस्थापन समितीने यावर्षीची उन्हाळी सहल विमान प्रवासाने करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने नियोजन केले. पालकांनीही संमती दर्शवली. अठरा मुली आणि तीन मुले अशा एकवीस विद्यार्थ्यांसह शाळा समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर, उपसरपंच लता भाटे, सदस्या प्रभावती खणगावकर, भरमू चौगुले, नागेंद्र खणगावकर यांनी चार दिवसांपूर्वी गोवा ते हैदराबाद असा प्रवास केला. पुस्तकात वाचून डोळ्यासमोर उभे राहिलेले चित्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. शाळेची सहल म्हणजे एसटी किंवा खासगी वाहनाचा आधार आणि गावापासून शंभर- दोनशे किलोमीटरच्या अंतरातील परिसराला भेट असे सर्वसाधारण नियोजन असते. परंतु सुरुते शाळेने थेट अवकाश सफर करुन सहलीच्या इतिहासात नवा पायंडा पाडला. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------
विमान प्रवासाचा आनंद
उंचावरुन दृष्टिक्षेपात येणारा अवघा परिसर, नद्या, डोंगर, विमानाला घासून जाणारे ढग आणि ढगांच्याही वरुन प्रवास करणारे विमान असा अद्‍भूत नजारा डोळ्यांत सामावला. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी पाहून जेवढा आनंद झाला त्यापेक्षाही अधिक आनंद विमान प्रवासाने झाल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT