कोल्हापूर

चंदगड तालुक्यात संविधान दिन

CD

chd283.jpg
47928
चंदगड ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. संजय पाटील. शेजारी इतर मान्यवर.
----------------
चंदगड तालुक्यात संविधान दिन
चंदगड ः तालुक्यात विविध ठिकाणी संविधान दिन साजरा झाला. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात इतिहास विभाग व प्राध्यापक प्रबोधिनीतर्फे हा दिवस साजरा केला. प्रकल्प अधिकारी डॉ. संजय पाटील यांच्याहस्ते संविधानाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. ए. डी. कांबळे यांनी संविधानाची माहिती सांगून संविधान शपथ दिली. प्रा. एम. एस. दिवटे, पी. जी. कांबळे, अरुण कांबळे, शोभा चंदगडकर उपस्थित होते. डॉ. टी. एम. पाटील यांनी आभार मानले.
हलकर्णी ः यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रा. एन. पी. पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. लोकशाही टिकवणे हे देशाच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. एन. के. जावीर, प्रा. एस. एस. सुभेदार, प्रा. सुरभी शिनोळकर, प्रा. भक्ती बसापुरे, परशुराम नाईक, अभिजित चव्हाण, अल्ताफ मकानदार आदी उपस्थित होते.
-------------------
कर निर्धारण यादीबाबत आवाहन
चंदगड ः येथील नगरपंचायतीने सर्व करपात्र मालमत्तेची यादी तयार केली असून मालक व भोगवटादार यांच्यासाठी ती खुली केली आहे. नगरपंचायत कार्यालयात सुट्टीखेरीज कार्यालयीन वेळेत ती पाहता येणार आहे. नमूद केलेल्या मालमत्तेच्या मूल्यनिर्धारणास व कर निर्धारणासंबंधी आक्षेप घ्यायचा असल्यास २० डिसेंबरपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या नावे अर्ज द्यायचे आहेत. त्यामध्ये सबळ पुरावे सादर करायचे आहेत. मुदतीनंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही असे कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT