कोल्हापूर

थेट पाईपलाईनचे पाणी सुरू

CD

47961
...

‘थेट पाईपलाईन’ चा पंप सुरू
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी ः ई वॉर्डला पाणी वितरण

कोल्हापूर, ता. २८ : थेट पाईपलाईन योजनेच्या वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरूस्त केल्यानंतर आज दुपारी एकपासून थेट पाईपलाईन योजनेतील एक पंप सुरू झाला. रात्रीपासून त्याचे पाणी ई वॉर्डमध्ये वितरण केले जाणार आहे. तसेच दुसरा पंपही लवकर सुरू केला जाणार आहे.
दरम्यान, आज बिद्री उपकेंद्रात तसेच उपसा केंद्राजवळील उपकेंद्राच्या ठिकाणची प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. त्यांनी दोन्ही पंप लवकर सुरू करण्याच्या सूचना जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या. दोन पंप सुरू झाल्यानंतर १४० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे या दोन पंपांवरच संपूर्ण पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
दहा नोव्हेंबरपासून योजनेतील एक पंप सुरू असून त्यातून आलेले पाणी ई वॉर्डला दिले जात होते. काळम्मावाडी येथील उपकेंद्र, तसेच बिद्री येथील उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने तो उपसा पंप दोन दिवस बंद ठेवावा लागला. त्यामुळे ई वॉर्डला शिंगणापूर योजनेमधून पाणी दिले जात होते. प्रशासकांनी दिलेल्या सुचनेनुसार उपसा केंद्रातील दुरुस्तीचे काम आज पुर्ण होऊन पहिला पंप दुपारी एक वाजता सुरू करण्यात आला. दुसऱ्या पंपासाठीही उपसा केंद्रात तयारी केली आहे. उद्यापर्यंत दुसरा पंप सुरू होऊ शकतो. त्यानंतर ई वॉर्डबरोबरच ए, बी वॉर्डमध्येही पाणी देण्याचे नियोजन आहे. शाखा अभियंता संजय नागरगोजे पाहणीवेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT