कोल्हापूर

लोकसभा राजकारण

CD

देवणे, संजय घाटगे उमेदवारीचे दावेदार

सेना नेत्यांकडून चाचपणी ः मुंबईत इच्छुकांशी साधला ठाकरेंनी संवाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य नेत्यांनी चर्चा केली. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सहसंपर्क प्रमुख विजय देवणे व माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह डॉ. चेतन नरकेही उपस्थित होते. श्री. देवणे व श्री. घाटगे उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजले जातात.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या, त्यावेळी शिवसेना एकसंघ होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना व श्री. ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना असे विभाजन झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रित आहेत. त्यातून महाविकास आघाडी आकाराला आली आहे.
२०१९ च्या निकषावर ‘महाविकास’ चे जागा वाटप झाल्यास दोन्ही जागा शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून बाजीराव खाडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याशिवाय अन्य कोणी इच्छुक नाही. डॉ. नरके हे लोकसभेसाठी ‘महाविकास’ कडून इच्छुक आहेत, पण त्यांचा पक्ष निश्‍चित नाही. या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचा आढावा ‘मातोश्री’ वर घेतला. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, सुनील प्रभू, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख उपस्थित होते. यात देवणे, घाटगे यांच्यासह नरके यांच्याशी चर्चा करण्यात आली. १७ नोव्हेंबरच्या दरम्यान ही बैठक झाली.
शिवसेनेचा उमेदवार कोण याचा निर्णय घेताना तो पक्षाशी प्रामाणिक असावा आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची त्याला संमती असावी, हा निकष ठरवण्यात येणार आहे. त्या जोरावर सद्यस्थितीत देवणे व घाटगे हेच प्रमुख दावेदार समजले जातात. निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल तशा या घडामोडी वाढणार आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेला जागा मिळाली तर उमेदवार विजयी झाला पाहीजे अशी तयारी ठेवा, अशी सूचना ठाकरे यांनी केली आहे.
...
‘महाविकास’ ची चर्चा करणार

शिवसेनेकडून स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी सुरू असली तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांची उमेदवाराविषयीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात श्री. ठाकरे हे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. जागा वाटपाचे सूत्र निश्‍चित झाल्यानंतर या घडामोडीला वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

Nagpur: वैद्यकीय पदवी घेणारी पत्नी मानसिक अस्थिर कशी; आयपीएस अधिकाऱ्याची याचिका फेटाळली

Nagpur: नवतपाच्या पहिल्याच दिवशी चटके; ब्रह्मपुरीचा पारा ४७.६ तर, नागपूर ४६.५ अंशांवर

Rwanda Economy: रवांडा : आफ्रिकेतील उदयोन्मुख अर्थव्यवस्था

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळ दूध संघात सतेज पाटील, मंत्री मुश्रीफांचे एकत्र पॅनेल? उघडउघड विरोध की अंतर्गत मैत्री जपणार

SCROLL FOR NEXT