47955
दऱ्याचे वडगावला
विविध कासकामांना प्रारंभ
कोल्हापूर, ता. २८ ः येथील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाला आमदार ऋतुराज पाटील यांच्या रूपाने हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाला आहे. त्यामुळेच मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू असल्याचे गौरवोदगार आमदार जयश्री जाधव यांनी काढले. दऱ्याचे वडगाव येथील विविध विकासकामांच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. आमदार ऋतूराज पाटील यावेळी उपस्थित होते.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून दऱ्याचे वडगांव मैदान विकसित करणे, नागनाथ मंदिर रस्ता, गैबी पीर देवस्थान रस्ता, दुधगंगा डावा कालवा, बेनके पाणंद पूल, दुधगंगा डावा कालवा सिद्धनेर्ली रोडवरील पूल, दलित वस्ती ओढ्यावरील साकव बांधकाम अशा एकूण एक कोटी १० लाखांच्या विकासकामांना यावेळी प्रारंभ झाला. दऱ्याचे वडगांव ग्रामस्थांच्या मैदानाची मागणी पूर्ण करण्यासाठी कटीबध्द असल्याचे आमदार श्री. पाटील म्हणाले.
माजी सरपंच अनिल मुळीक यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी सरपंच छाया मुळीक, उपसरपंच सखुबाई खोत, ग्रामपंचायत सदस्या पूनम म्हेत्तर, अर्चना बेनके, नयना भोसले, रुपाली मगदूम, गीता कांबळे, उत्तम बोडके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.