कोल्हापूर

बंद कूपनलिकांची दुरुस्ती मोहिम

CD

बंद कूपनलिकांची दुरुस्ती मोहिम
आमदार आवाडे यांचा पुढाकार ः नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२८ ः इचलकरंजी महापालिका हद्दीतील प्रदीर्घकाळापासून बंद पडलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती मोहिम सुरु केली आहे. यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून स्वखर्चातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार विविध भागातील कुपनलिकांची युध्दपातळीवर दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध होत आहे.
इचलकरंजी शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी या उद्देशाने शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कुपनलिकांची खुदाई केली. परंतु यापैकी अनेक कुपनलिका नादुरुस्त झाल्या आहेत. काही कुपनलिकांच्या विद्युत मोटारी खराब झाल्याने त्या बदलण्याची गरज आहे. यासंदर्भात अनेक भागातून नागरिकांनी व भागातील लोकप्रतिनिधींनी आमदार आवाडे यांच्याकडे बंद अवस्थेतील कुपनलिकांची दुरुस्ती करुन पाण्याची सुविधा करुन देण्याबाबत मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदार आवाडे यांनी सविस्तर माहिती जाणून घेत बंद पडलेल्या व दुरुस्ती होऊ शकणाऱ्‍या अशा कुपनलिकांची जबाबदारी स्विकारली. त्या कूलनलिका स्वखर्चातून त्यांची दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली आणि त्याचे कामही सुरु केले. त्यानुसार बंद अवस्थेतील कुपनलिकांच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. हे काम तातडीने पूर्ण होऊन भागातील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्‍न दूर होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT