तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालाः लोगो
...
47966
...
‘एआय’च्या वापराने जीवन सुकर होणे शक्य
डॉ. भूषण केळकर ः तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय तंत्रज्ञान) आपल्या घरापर्यंत आले आहे. आगामी पाच - सात वर्षांत जगभरातील ८६ टक्के नोकऱ्या जातील, पण ९७ टक्के नोकऱ्यांची संधीही निर्माण होणार आहे. त्यासाठी आतापासून नवनवीन माहिती तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे. त्यातून आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर आपले जीवन सुकर करण्यास होऊ शकेल’, असे प्रतिपादन डॉ. भूषण केळकर यांनी आज येथे केले.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, महालक्ष्मी सहकारी बॅंक व तेंडुलकर परिवार यांच्या वतीने येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेस सुरुवात झाली. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ःभविष्यातील आव्हाने’ या विषयावर डॉ. केळकर यांनी पहिले पुष्प गुंफले.
ते म्हणाले, ‘जगभरातील प्रगत राष्ट्रात ‘एआय’चा वापर सुरू झाला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. भारतात सर्वाधिक लोकसंख्या आहे. माहिती तंत्रज्ञानाचे सर्वाधिक युजर्स हे भारतात आहेत. त्यामुळे नव्या तंत्राचा प्रभावी वापरही येथेच होऊ शकतो. व्यापार, उद्योगापासून व्यक्तिगत आयुष्यात एआयचा वापर वाढेल, तसा नोकरीच्या संधी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. केवळ औद्योगिक क्षेत्रात एआयचा वापर होईल. आपल्या जगण्यावर किंवा अन्य क्षेत्रावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येते. मात्र, त्यात फारसे तथ्य नाही. रोबोटचा वापर करून ठाण्यात, कोल्हापुरात हॉटेल चालवले जाते. वैद्यकीय उपचारात रोबोटचा वापर सुरू झाला आहे. एआयच्या आधारे घरबसल्या शुगरही बघता येते. अनेक विषयातील माहिती घेऊन न्याय निवाडे देण्याला गती लाभते. कलात्मक छायाचित्रे घेणे, मूर्ती बनवणे, चित्र काढण्यासाठी एआय तंत्र वापरले जात आहे. इतकेच नव्हे तर कविता, भाषांतर किंवा एखाद्या विषयावरील मजकूर मिळविण्यासाठी एआयचा वापर आपल्याच देशातील अनेक शहरांत होत आहे. त्याचे परिणाम आपल्याजवळ येण्यास फारसा वेळ लागणार नाही हेही उघड आहे. अशा स्थितीत नोकरी गेली, तर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आपण सतर्क होऊन येणाऱ्या काळात नवीन ज्ञान मिळवण्याबरोबरच डेटा ॲनालेसिसवर भर द्यावा लागेल. ज्यांच्याकडे सर्वाधिक माहिती किंवा डेटा जास्त आहे, त्यांच्यासाठी एआयचा वापर अधिक हितकारकही ठरणार आहे.’
दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी स्वागत केले. प्रशांत कासार यांनी आभार मानले. यावेळी केदार तेंडुलकर, अनुराधा तेंडुलकर, ॲड. विवेक शुक्ल आदी उपस्थित होते.
...
‘एआयचा वापर करण्यासाठी भाषेत निष्णात असावे लागेल, गणिती सूत्रे आपल्याला माहिती असावी लागेल, तरच आपल्याला एआयचा वापर करता येईल, असे अनेक गैरसमज ज्येष्ठांमध्ये आहेत. सध्या तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर करता, या बाबी जशा तुम्ही सरावातून शिकलात, त्याच पद्धतीने एआयचा वापरही सरावातून करता येणे शक्य होईल. त्यासाठी शिकण्याची जिज्ञासा मनात कायम जागी ठेवावी लागेल,’ असेही डॉ. केळकर यांनी सांगितले.
...
आजचे व्याख्यान
वक्तेः अभिनेता संकर्षण कऱ्हाडे
विषयः नाट्यक्षेत्रः व्हायरल आणि वस्तुस्थिती
वेळः सायंकाळी सहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.