कोल्हापूर

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल संघ विजेता

CD

लोगो - भैय्यासाहेब बावडेकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा
48766
कोल्हापूर : विजेता आयर्विन ख्रिश्‍चन संघाला विजेतेपदाचे बक्षीस देताना नील​राजे पंडित-बावडेकर. सोबत मान्यवर.

आयर्विन ख्रिश्चन संघ विजेता
पंधरा वर्षाखालील स्पर्धा; संजय घोडावत स्कूल उपविजेता
कोल्हापूर, ता. २ : भैय्यासाहेब बावडेकर स्मृती चषक पंधरा वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व नील​राजे पंडित-बावडेकर पुरस्कृत ​ही स्पर्धा आहे. स्पर्धेत १२ शालेय संघांनी ​सहभाग घेतला होता.
अंतिम सामना आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ​विरुद्ध संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये ​झाला. प्रथम फलंदाजी करताना घोडावत ​स्कूल संघाने ३० षटकात ४ बाद १२० धावा झाल्या. यामध्ये विश्‍व ठक्कर ४०, कुणाल सारडा ३१, तर विजय के याने नाबाद १० धावा केल्या. गोलंदाजी करताना आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल​च्या शिवराज संकपाळ ​४, वीरेन कोळकी ​३ बळी घेतले. उत्तरा दाखल खेळताना आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल​ संघाने २४.१ षटकात ५ बाद १२२ धावा ​करत सामना जिंकला. यामध्ये आदित्य जाधव नाबाद ७२ धावांची खेळी केली त्यास विरेन कोळकी याने २० धावा ​करत साथ दिली. गोलंदाजी करताना घोडावत स्कूलच्या अद्वेत नार्वेकर २​, विहान लादा ​२​, संकेत पाटील ​१ बळी घेत​ला.
बक्षीस वितरण नील​राजे पंडित-बावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘केएसए’चे पदाधिकारी माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, राजेंद्र दळवी, विश्‍वंभर मालेकर, दीपक घोडके उपस्थित होते.
---------------
स्पर्धेतील उत्कृष्ट असे
फलंदाज - आदित्य जाधव, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल
गोलंदाज - विश्‍व ठक्कर, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल
मालिकावीर - अर्णव पाटील, सेंट झेवियर्स स्कूल
सामनावीर - आदित्य जाधव, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT