Human Interest Story esakal
कोल्हापूर

Human Interest Story : 'त्या' जिद्दी दिव्यांग कामगारांचं दिव्य काम! 'शिंपुकडे ग्रुप'नं संधी दिली अन् त्यांनीही केलं संधीचं सोनं!

सूरजित यांनी इतिहास, तर संदीप यांनी सामाजिक शास्त्रातून पदवी मिळवली. या दोघांना जन्मतः अंधत्व (Blindness) आहे.

सकाळ डिजिटल टीम

अंधत्व आणि अपंगत्व असल्याने काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, शिंपुकडे ग्रुपचे अध्यक्ष बी. एस. शिंपुकडे यांनी आधार दिला.

-संतोष मिठारी

कोल्हापूर : जन्मतः असलेले अंधत्व आणि अपघातात एक हात गमावलेला... ही दिव्यांग माणसं मशीन शॉपमध्ये काम करू शकतात? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेच आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीतील (Gokul Shirgaon MIDC) तीन कामगारांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. शिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनीजच्या (Shimpukade Group of Companies) व्यवस्थापनाने त्यांना ही संधी दिली. सैनिक टाकळीतील सूरजित पाटील, सडोली खालसातील संदीप मगदूम आणि मुरगूड (Murgud) येथील संतोष रानमाळे या तीन जिद्दी कामगारांची ही संघर्षकथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सूरजित यांनी इतिहास, तर संदीप यांनी सामाजिक शास्त्रातून पदवी मिळवली. या दोघांना जन्मतः अंधत्व (Blindness) आहे. पदवी शिक्षणानंतर (Education) नोकरीच्या शोधात असताना त्यांना अवजड, चारचाकी वाहनांचे सुटे भाग उत्पादन करणाऱ्या शिंपुकडे ग्रुपच्या मशीनशॉपमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परदेशात निर्यात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुटे भागांची तपासणी, पॅकेजिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर कंपनीने सोपविली. या कामाबाबत त्यांचे कुटुंबीय, कंपनीतील अधिकाऱ्यांमध्ये साशंकता होती.

पण, त्यांनी कमी वेळेत कौशल्य मिळविले. मुरगूडमधील संतोष यांना लहानपणी पिठाच्या गिरणीमध्ये झालेल्या अपघातात उजवा हात गमवावा लागला. त्यांना ‘एमआयडीसी’मध्ये कोणी कामावर घेत नव्हते; पण या कंपनीने दिलेल्या संधीचे सोने करत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली.

बारा वर्षांपासून वेळेवर हजर, कामात अचूकता

सैनिक टाकळी-इचलकरंजी-तावडे हॉटेल ते गोकुळ शिरगाव ‘एमआयडीसी’ या मार्गावर रोज तीन बसेस बदलून १३० किलोमीटरचा प्रवास सूरजित करतात. सडोली खालसा ते गोकुळ शिरगाव ‘एमआयडीसी’पर्यंत दोन बसेस बदलून ७० किलोमीटरचा प्रवास संदीप करतात. मात्र, कंपनीत ते वेळेवर हजर असतात. बारा वर्षांत त्यांनी तपासून दिलेला एकही जॉब रिजेक्ट झालेला नाही. वेळेत आणि ठरवून दिल्यापेक्षा जादा काम ते करतात, असे कंपनीचे व्यवस्थापक बाबासाहेब डोईफोडे, सहायक व्यवस्थापक अक्षय कदम सांगतात.

आधार मिळाला, आयुष्य घडले

अंधत्व आणि अपंगत्व असल्याने काम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, शिंपुकडे ग्रुपचे अध्यक्ष बी. एस. शिंपुकडे यांनी आधार दिला. त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला नोकरी दिली. त्यातून आमचे आयुष्य घडले आहे. समाजात एक वेगळी सन्मानाची ओळख मिळाली असल्याची प्रतिक्रिया सूरजित, संदीप आणि संतोष यांनी दिली.

उद्योजकांनी दिव्यांगांना द्यावी संधी

बारा वर्षांपूर्वी आमच्या काही उत्पादनांबद्दल ग्राहकांची तक्रार आली. त्यावर उत्पादनांची अचूकपणे तपासणी करण्यासाठी कामगार शोधत होतो. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रोजगार मेळाव्यासाठी काही दिव्यांग आले होते. सामाजिक जबाबदारी आणि दिव्यांग कामात अचूक असल्याच्या अनुभवावरून त्यातील काहीजणांची निवड करण्याचा निर्णय मी घेतला. त्याला पत्नी प्रतिभा, मुले प्रणव, प्रसाद यांनी पाठबळ दिले. आम्ही निवड केलेल्या आठ दिव्यांगांमध्ये सूरजित, संदीप यांचा समावेश होता. सद्य:स्थितीत ते नियमित कामगारांपेक्षा सरासरी वीस टक्के जादा काम करतात. उद्योजकांनी त्यांच्या कंपनीमध्ये दिव्यांगांना संधी द्यावी, असे आवाहन बी. एस. शिंपुकडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT