कोल्हापूर

संत बाळूमामा देवस्थान गैरव्यवहारसंदर्भात मंगळवारी मोर्चा

CD

संत बाळूमामा देवस्थान
गैरव्यवहारसंदर्भात मंगळवारी मोर्चा
महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा मंदिर देवस्थानातील गैरव्यवहाराची त्वरित ‘सीआयडी’ चौकशी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे मंगळवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उपशहरप्रमुख शशिकांत बिडकर, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब बन्नेवार, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्यासह आनंदराव पवळ, प्रतिभा तावरे, रामभाऊ मेथे उपस्थित होते. ‘हा मोर्चा मंगळवारी सकाळी ११ वाजता दसरा चौक येथून सुरु होऊन व्हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात येईल’, असे मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT