# आचार्य विद्यासागरजी महाराज जीवन परिचय
पूर्ण नाव : विद्याधरजी
पिता : मल्लाप्पाजी अष्टगे
मातोश्री : श्रीमतीजी
मातृभाषा : कन्नड
जन्म स्थान : १० ऑक्टोबर १९४६, चिक्कोडी (बेळगाव, कर्नाटक)
शिक्षण : मॅट्रिक
ब्रह्मचर्य व्रत : श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, चूलगिरी, खाणीयाजी, (जयपूर, राजस्थान)
प्रतिमा : सात (आचार्यश्री देशभूषणजी महाराज यांच्याकडून)
स्थळ : १९६६ श्रवणबेळगोळ
मुनि दीक्षा : आचार्यश्री ज्ञानसागरजी महाराज, अजमेर
दीक्षा तारीख : ३० जून १९६८
आचार्य पद : २२ नोव्हेबर १९७२
# आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी दिलेल्या दीक्षा
दिगंबर मुनी दीक्षा-१६१, आर्यिका दीक्षा-१७२, ऐलक दीक्षा-२२, क्षुल्लक दीक्षा- २४, क्षुल्लिका दीक्षा- ६१ (दीक्षा घेतलेले सर्वसाधक बालब्रम्हचारी आहेत)
# आचार्य विद्यासागर महाराज यांची लेखनसंपदा
-मूकमाटी महाकाव्य
-नर्मदा का नरम कंकर
-डुबो मत लगाव डुबकी
-तोता क्यों रोता
-चेतना के गहराव में
-१२ हिंदी शतक
-आचार्य स्तुती सरोज
-पाचशेहून अधिक हायकू
-संस्कृत रचना
-शारदास्तुती
-पंचास्तिकायचे संस्कृत प्रतिरूपक
-सहा संस्कृत शतक
-धोरोदय चंपुकाव्य
-जैनाचार्यांचे २२ ग्रंथांचे पद्यानुभव
-आध्यात्मिक भजन-१०
-भक्ती पुस्तिका-९
-इंग्रजी, बंगाली, कन्नड, प्राकृत भाषेत स्फूट रचना
(आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी लिहिलेल्या ‘मूकमाटी’ या महाकाव्यावर ५६ हून अधिक संशोधकांनी पीएच.डी. मिळवली आहे.)
# लोकदानातून सुरू १०० गोशाळा
आचार्य विद्यासागर महाराज यांच्या आशीर्वादाने दयोदय महासंघाद्वारे देशभरात १०० गोशाळा सुरू आहेत. मध्यप्रदेश- ६३, राजस्थान- २८, दिल्लीत-२, छत्तीसगड-२, उत्तरप्रदेश-२, महाराष्ट्र-३ या शंभर गोशाळांमध्ये ६५ हजार वृध्द असहाय्य, व्याधीग्रस्त गायींचे संगोपन केले जाते. चारा-पाणी, औषधोपचारांची व्यवस्था केलेली आहे. या गोशाळांवर प्रतिदिन दहा लाखांवर रक्कम खर्च होत आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ लोकदानातून हा खर्च केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.