68866
...
‘रोजगार दो, न्याय दो’ पोस्टरचे अनावरण
कॉंग्रेस आणणार जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न समोर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ‘रोजगार दो, न्याय दो’ या कार्यक्रमाच्या पोस्टरचे आज कोल्हापुरात अनावरण करण्यात आले. या निमित्ताने जनसामान्यांना भेडसावत असलेले प्रश्न समोर आणले जाणार आहेत.
विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, सहप्रभारी एहसान खान, कोल्हापूर लोकसभा समन्वयक जयदीप थोरात, राहुल उगले, अरविंद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, शहर जिल्हाध्यक्ष उदय पवार, कुडाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, रियाज सय्यद, मुझफ्फर टिनवाले, रोहन शाळबिद्रे, आनंदा करपे, सुजित प्रभावळे, प्रदीप ढाकरे, विकी कांबळे, निलेश खरबडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.