68904
कोल्हापूर : केएम चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉल शौकिनांनी छत्रपती शाहू स्टेडियम खचाखच भरले होते. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
......
68905
कोल्हापूर : के.एम. चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या शिवाजी तरुण मंडळास चषक प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, युवराज मालोजीराजे छत्रपती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक, राजेंद्र चव्हाण, राहुल चिकोडे आदी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
......
68907
कोल्हापूर : के.एम. चषक फुटबॉल स्पर्धेतील उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळ संघाला चषक प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. सोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, मालोजीराजे छत्रपती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक, राजेंद्र चव्हाण, राहुल चिकोडे आदी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
...............
68915
कोल्हापूर : के.एम. चषक फुटबॉल स्पर्धेतील शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अंतिम सामन्यातील क्षण.
.............
68908
करण चव्हाण-बंदरे
(बेस्ट फॉरवर्ड)
.....
68909
कुणाल दळवी
(बेस्ट हाफ)
........
68910
आदित्य लायकर
(बेस्ट डिफेन्स)
......
68911
अर्नेदृ दत्ता
(गोल किपर)
...............
शिवाजी मंडळ के. एम. चषकाचा मानकरी
खंडोबा तालीम मंडळावर दोन विरुद्ध एक गोलने मात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळ संघावर दोन विरुद्ध एक गोलने मात करत खंडोबा तालीम मंडळ आयोजित के. एम. चषक पटकावला. स्पर्धेतील अंतिम सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळविण्यात आला. विजेत्या व उपविजेत्या संघांना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, के.एस.ए.चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव खाडे, विजयकुमार देशमुख, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, शिवाजी पाटील, राजेंद्र चव्हाण, युवराज बचाटे उपस्थित होते.
तत्पूर्वी सामन्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. सामन्याच्या सुरुवातीपासून शिवाजी तरुण मंडळाने आक्रमक खेळ करत खंडोबा तालमीवर दबाव निर्माण केला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला योगेश कदमने गोल नोंदवत शिवाजी मंडळ संघाला एक गोलने आघाडी मिळवून दिली. यानंतर खुर्शीद अलीने मारलेला फटका खंडोबा तालमीचा गोलरक्षक अर्णेदृ दत्ता याने रोखला. यानंतर खंडोबा तालीमकडून प्रतिआक्रमण झाले. यामध्ये कुणाल दळवीचा प्रयत्न अपयशी ठरला, तर सुधीर कोटिकला याने केवल कांबळेच्या पासवर हेडद्वारे फटकावलेला चेंडू गोल जाळीच्या बाहेर गेला. पुन्हा शिवाजी मंडळाकडून आक्रमण होऊन रोहन आडनाईकने मारलेले फ्री किक दत्ताने रोखला.
उत्तरार्धात शिवाजी मंडळाने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. यामध्ये यश येऊन सिद्धेश साळुंखेच्या पासवर करण चव्हाण-बंदरे याने गोल नोंदवत संघाला दोन विरुद्ध शून्य अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांकडून वेगवान चढाया झाल्या. मात्र, दोन्ही संघांनाही गोल नोंदविण्यात यश आले नाही. सामन्याच्या ८० व्या मिनिटाला खंडोबा तालीमच्या प्रतीक सावंतने गोल नोंदवत गुणसंख्या दोन विरुद्ध एक अशी केली. अधिकच्या वेळेत खंडोबा तालीमच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक खेळ केला. मात्र, गोल नोंदविण्यात यश आले नाही. अखेर हा सामना शिवाजी तरुण मंडळ संघाने दोन विरुद्ध एक असा जिंकून विजेतेपद पटकावले.
..........
चौकट
दहा हजारांवर प्रेक्षक
स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजारांवर प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी केली होती. अंतिम सामना पाहण्यासाठी महिला व मुलांनी गर्दी केली होती, तर काही उत्साही प्रेक्षकांनी थेट मैदानावर थांबून सामना पाहिला. संपूर्ण मैदानाबाहेर दुचाकी गाड्यांचा गराडा होता. बेशिस्त पार्किंमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. यासह गाड्यांच्या गर्दीतून वाट काढून मैदानात जाणेदेखील कठीण झाले होते.
......
चौकट...
विशेष खेळाडू
सामनावीर ः संदेश कासार - (शिवाजी तरुण मंडळ)
लढवय्या ः संकेत जरग (खंडोबा तालीम मंडळ)
स्पर्धेतील उत्कृष्ट
मालिकावीर ः योगेश कदम (शिवाजी तरुण मंडळ)
गोलरक्षक ः अर्णेदृ दत्ता (खंडोबा तालीम मंडळ)
डिफेन्स ः आदित्य लायकर (खंडोबा तालीम मंडळ)
हाफ ः कुणाल दळवी (खंडोबा तालीम मंडळ)
फॉरवर्ड ः करण चव्हाण-बंदरे (शिवाजी तरुण मंडळ)
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.