कोल्हापूर

वडणगे यात्रा पुरवणी

CD

डोके- शिवपार्वती फोटो वापरा- वडणगे महाशिवरात्री यात्रा विशेष


47639
वडणगे येथील महादेव मंदिर
47643
वडणगे- येथील महादेव मंदिरातील शिवलिंग

फोटो 47635
वडणगे पार्वती मंदिरात भाविकांसाठी उभारलेला मंडप (सर्व छायाचित्रे ः सतीश फोटो वडणगे)
-
47637
वडणगे येथील ग्रामदैवत पार्वती देवी मूर्ती
-
47640
येथील कोंबड्याची मूर्ती

लीड
पंचगंगा नदीकाठावरील असलेले वडणगे (ता. करवीर) येथील श्री शिवपार्वती मंदिर तीर्थक्षेत्र करवीर काशी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे महाशिवरात्रीला पंचक्रोशीतील यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येतात. करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख असणाऱ्या भगवान शंकर पार्वतीच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या तीर्थक्षेत्र वडणगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी शंकर, पार्वती उतरले तो पार्वती तलाव, त्याच तलावाच्या अग्नेय दिशेला महादेव मंदिर असून, नैऋत्य दिशेला पार्वती मंदिर आहे. शंकर-पार्वती मंदिर मार्गावर कोंबड्याचे प्रतीक हे वैशिष्ट्य आहे.
----------------------

वडणगेचे तीर्थक्षेत्र
श्री शिवपार्वती...

श्री महालक्ष्मीने करवीर क्षेत्री देवादिकांचा दरबार भरविण्याचे ठरविले. त्यासाठी नारदमुनींच्यामार्फत शंकर-पार्वतीला निमंत्रण पाठविले. या निमंत्रणावरून श्री शंकर-पार्वती नंदीसह करवीर क्षेत्री जाण्यास निघाले. भोगावती, कासारी नद्यांच्या संगमावर श्रीक्षेत्र प्रयाग येथे स्नान करून पुढे निघाल्यावर त्यांना वाटेत वडणगे गाव लागले. वस्ती असल्याचे पाहून ते थांबले. शंकर-पार्वती तेथे थांबले असता, एका राक्षसाने कोंबड्याचे रूप घेऊन कोंबडा आरवल्याचा आवाज काढला. कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकून शंकर-पार्वती तेथेच गुप्त झाले. पण, कोंबड्याच्या रूपात राक्षस असल्याचे पार्वतीच्या लक्षात येताच तिने त्या कोंबड्याचा शिरच्छेद केला. महादेव मंदिर म्हटले की, गाभाऱ्यात शिवलिंग आणि त्याच्या बाहेर नंदी हे शंकराचे वाहन पाहायला मिळते. पण, कोल्हापुरातील रंकाळा परिसरात नंदीची मोठी मूर्ती असून, गाभाऱ्याबाहेर शिवलिंग आहे. त्याची कथा अशी की, भगवान शंकर आणि पार्वती हे पृथ्वी तलावर आल्यानंतर वडणगे येथे विश्रांतीसाठी थांबले, तेव्हा नंदीने देवशंकराकडे फिरून येण्याची परवानगी मागितली. तेव्हा शंकरांनी नदी ओलांडून न जाण्याच्या अटीवर परवानगी दिली. नंदी फिरत फिरत पंचगंगा नदी ओलांडून रंकाळ्याजवळ पोहोचला. खूप वेळ नंदी न आल्याने भगवान शंकरांना राग आला आणि त्यांनी नंदीला शाप दिला म्हणाले,‘तू जिथे आहेस तिथेच थांबशील, त्यानंतर नंदीने गयावया करून हा शाप मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा शंकरांनी त्याला दर महाशिवरात्रीला ‘तू गहूभर पुढे’ आणि तीळभर मागे सरकाशील’ असे सांगितले. हा प्रावास करताना जर रंगभैरवाला स्पर्श झाला, तर त्यावेळी महाप्रलय येईल, असेही सांगितले. शंकर-पार्वती नंदीसह या तीर्थक्षेत्री आल्याचे या कथा सांगतात. शंकर-पार्वतीचे वडणगे गावातील आगमन, त्यांची दोन स्वतंत्र मंदिरे, रंकाळ्यावरील नंदी, पार्वतीने शिरच्छेद केलेल्या कोंबड्याचे वडणगे येथे प्रतीक आहे.

महाशिवरात्री यात्रेवेळी शंकर पार्वतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. आसपासच्या खेड्यांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई, येथून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी पहाटे ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक घातला जातो. गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात देवाची पालखी मानकऱ्यांसोबत काढली जाते. यात्रेशिवाय श्रावणातील सोमवार व दसरा यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी होते. नवरात्रात देवीची वेगवेगळ्या रूपात सालंकृत पूजा बांधली जाते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी महापूजा होते. या व्यतिरिक्त मंदिरात भजन, ग्रंथवाचन, ज्ञानेश्‍वरी पारायण असे कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात. महादेव मंदिरात आणि पार्वती मंदिरात पूजेचा मान गुरव बंधूंकडे आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक महादेव मंदिर देवस्थान व पार्वती मंदिर देवस्थान समिती कार्यरत आहे. दोन्ही समित्यांसह ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, झाडवाट कुरण मंडळ, गावातील सेवा संस्था, पतसंस्थांसह इतर संस्थांच्या सहकार्याने यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

---------------
चौकट
शिवपार्वती तलाव
गावच्या उत्तरेला ३२ एकरांत असलेला ऐतिहासिक तलाव हा संबकेश राजा याने खोदला आहे. तो शिवभक्त होता. तलावाला श्रमदानाचा इतिहास आहे. तलावात बारमाही पाणी असते. शिवपार्वती तलाव गावच्या निसर्गसौंदर्यात भर घालतो. सहा महिन्यांपूर्वी आमदार चंद्रदीप नरके यांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी १४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.
----------------
वडणगे गावची वैशिष्‍ट्ये
- गावाला ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक पार्श्‍वभूमी
- कबड्डीची समृध्द परंपरा
- सहकारी दूध संस्था, सेवा संस्था, पतसंस्था, आदी संस्थांतून सहकार रुजला
- गावचे अनेक तरुण शासकीय, पोलिस सैन्य सेवेत आहेत
- गावाला शैक्षणिक वारसा
- पंचगंगा नदीमुळे गावची जमीन सुपीक असल्याने गाव सधन
- गावात वर्षापूर्वी तरुणांनी लोकवर्गणीतून सुसज्ज क्रीडांगण तयार केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT