कोल्हापूर

ऐन लगीन घाईत सोने कडाडले

CD

फाईल फोटोः सोने
...
सोने कडाडले, बजेट कोलमडले
ऐन लगीनघाईत दर वाढल्याने पालक चिंतेत; बाजारपेठेवरही परिणाम

सचिन भोसले ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः स्त्री उच्चशिक्षित असो वा अशिक्षित, ग्रामीण असो वा शहरी, कष्ट किती करावे लागले तरी चालेल; पण अंगावर तोळाभर सोनं हवंच. असे स्वप्न असतेच. अशा मौल्यवान सोन्याचा वर्षभरात प्रति १० ग्रॅमचा दर तब्बल ७ हजार ३३८ रुपयांनी वाढला आहे. कडाडलेल्या सोन्याच्या दरामुळे ऐन लग्नसराईत नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवरही झाला असून, मागणी कमी झाली आहे.
सोन्याचे मणी मंगळसूत्र, गंठण, कानातील फुले, रिंगा ही तर सर्वसामान्य स्त्रीचे दाक्षिण्य होय. या दागिन्यांबद्दल असंख्य कथा स्त्रियांच्या जगण्याशी जोडल्या आहेत. सोनं शरीरावर घालणे याला वेगळ्या रितीही आहेत. त्यामुळे ग्रॅम नव्हे तर अगदी गुंजभर कणालाही मोठे महत्त्व. त्यात लग्नसराईत तर वधूला मणी मंगळसूत्र, वराला अंगठी हमखास घातली जाते. अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचेच दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा परिस्थितीत मुलाचे, मुलीचे लग्न कसे पार पडणार असा सवाल पालकवर्गाला पडला आहे.

सोन्याच्या दराची कमान चढतीच का?
डॉलरच्या तुलनेत रुपायाची घसरण सुरू आहे. त्यामुळे भारतात सोने आयात होत असल्याने महाग होऊ लागले आहे. त्याचा थेट परिणाम दरावर होत आहे. याशिवाय महागाईचा दर बघता अमेरिकेतील सेंट्रल बँक (फेडरेशन बँक)ने व्याज दरात कपातीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. जागतिक पातळीवर सोन्याचे दागिने, बिस्किटाला मागणी वाढली आहे. याशिवाय इस्त्राईल हमास अनिश्‍चत काळासाठी युद्ध सुरू आहे. त्याचाही सोने दरावर मोठा परिणाम झाला आहे.
-----
ग्राफ करावा
प्रति १० ग्रॅमचा वर्षभरातील दर
मार्च २०२३ - ५९, ५१२ रुपये
एप्रिल २०२३ - ६०,८८० रुपये
मे २०२३ - ६०,९३० रुपये
जून २०२३ - ५९,९४० रुपये
जुलै २०२३ - ६०,२६० रुपये
ऑगस्ट २०२३ - ६०,६७० रुपये
सप्टेंबर २०२३ - ५८,६८० रुपये
ऑक्टोबर २०२३ - ६२,८१० रुपये
नोव्हेंबर २०२३ - ६२,१२० रुपये
डिसेंबर २०२३ - ६३,८७० रुपये
जानेवारी २०२४ - ६३,१५० रुपये
फेब्रुवारी २०२४ - ६२,१५७ रुपये
मार्च २०२४ - ६६,८५० रुपये
......
कोट
सोन्याचे दर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणी कमी आहे. परंतु, जागतिक घडामोडी पाहता येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात ग्राहकांनी योग्य नियोजन करावे.
- फुलचंद गुंदेशा, सराफ व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT