कोल्हापूर

गर्भलिंग चाचणीप्रकरणी बोगस महिला डॉक्टरला अटक

CD

गर्भलिंग निदानप्रकरणी
बनावट डॉक्टर महिलेला अटक
स्वप्निल पाटीलच्या चौकशीत नाव उघड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १०ः बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीप्रकरणी करवीर पोलिसांनी भारती कृष्णात फराकटे (वय ४५, रा. फराकटेवाडी, ता. कागल) या बनावट डॉक्टर महिलेला अटक केली. संशयित बनावट डॉक्टर स्वप्निल पाटील याच्या पोलिस चौकशीत फराकटे हिचे नाव समोर आले. तिला न्यायालयात हजर केले असता १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमधील अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी १६ जानेवारीला छापा टाकला होता. मुख्य सूत्रधार स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याच्यासह नऊ जणांना आतापर्यंत करवीर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्निल पाटीलच्या चौकशीत फराकटे हिचे नाव उघड झाले. फराकटे हिच्याविरोधात याआधीही बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी केल्याचा गुन्हा दाखल असून ती सध्या जामिनावर बाहेर होती. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक युनूस इनामदार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BAN W Live: एक नंबर! २१ वर्षीय श्री चरणीने इतिहास रचला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; बांगलादेशची दैना

Mahur Crime : माहूर येथे प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

Delhi Crime: अल्पवयीन मुलीचं खून प्रकरण! 'तो' कॅब चालक निघाला नुपंसक, अत्याचार करण्यात अपयशी ठरल्याने केली निर्घृण हत्या

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

SCROLL FOR NEXT