Panchganga River
Panchganga River esakal
कोल्हापूर

मगरींनी वेढलेल्या नदी पात्रात 5 दिवस जगण्याचा संघर्ष; अन्नाअभावी आदित्यने चिखल खाऊन मृत्यूशी केली झुंज!

सकाळ डिजिटल टीम

तब्बल पाच दिवस अन्नाअभावी आदित्य बंडगरने (Aditya Bandgar) चिखल खाऊन मृत्यूशी केलेली झुंज ‘देव तारी त्याली कोण मारी’ असा प्रत्यय देणारी ठरली.

शिरोळ : क्षणाचा राग डोक्यात घेऊन त्याने थेट नदीत उडी मारली. घरच्यांसह मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. नदी काठावर चप्पल सापडल्याने घरच्यांची घालमेल वाढली. मगरींनी (Crocodile) वेढलेल्या पंचगंगा नदी (Panchganga River) काठावर पाच दिवसांपासून बेपत्ता युवकाचा शोध सुरू होता. जवळपास सर्वच आशा मावळल्या असताना, काल (शुक्रवार) सकाळी काही ग्रामस्थांच्या कानावर त्याचा आवाज पडला.

त्यानंतर व्हाईट आर्मीच्या (White Army) जवानांनी नदी पात्रालगतच्या सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात उतरून या मुलाला वाचवले. तब्बल पाच दिवस अन्नाअभावी आदित्य बंडगरने (Aditya Bandgar) चिखल खाऊन मृत्यूशी केलेली झुंज ‘देव तारी त्याली कोण मारी’ असा प्रत्यय देणारी ठरली. शिरोळ (Shirol) तालुक्यातील शिरढोण येथील या साऱ्या थराराची माहिती व्हाईट आर्मीच्या पथकाकडून देण्यात आली.

आदित्य इयत्ता अकरावीत शिकतो. त्याचा सोमवारी (ता. १८) सकाळी घरी किरकोळ वाद झाला. त्या रागातून तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याचे चप्पल त्याच सायंकाळी शिरढोण गावाच्या हद्दीत पंचगंगा नदीकाठावर सापडले. त्याने स्वतःचे बरे-वाईट करून घेतल्याची पाल घरच्यांच्या मनात चुकचुकली. एकुलता एक मुलगा असा बेपत्ता झाल्याने आई, वडील, बहिणीची एकच घालमेल सुरू होती.

नदी काठावर शोधमोहीम..

आदित्यने शेतीजवळील पंचगंगा नदीपत्रात उडी घेतल्याची शंका गडद झाल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. आदित्य गायब असल्याचे समजल्याने गावकरी नदी काठावर जमू लागले. नदीत मगरींचा खुलेआम वावर असल्याने पाण्यात उतरण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शोधमोहिमेसाठी तहसील कार्यालयातून बोट आणली. त्याचवेळी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवारपासून सायंकाळपासून शोधमोहीम सुरू झाली. ग्रामस्थांनी बोटीतून शिरढोणचा सर्व नदीकाठ पिंजून काढला. मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी तिन्ही दिवस शोधमोहीम सुरू होती. गाव आणि परिसरात आदित्यच्या बेपत्ता होण्याची एकच चर्चा होती.

जॅकवेलजवळील खड्डाही मगरींच्या वावराचा!

शिरढोण गावाला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल पंचगंगा नदीत आहे. या जॅकवेलपासून काही अंतरावर हा २५ फूट खोल खड्डा असून, तो झुडपांनी आणि केंदाळाने व्यापला आहे. त्या भोवती मगरींचा वावर नित्याचा असतो. सुरुवातीला तिकडे जायचे कोणाच्याही लक्षात आले नाही. शोधपथकाने आदित्य जिवंत असेल, अशा सर्व आशा सोडून आज शोधमोहीम सुरू केली, सुदैवाने आदित्य सुखरुप होता.

तीन दिवसांनी शोधमोहिमेला ब्रेक

मगरींनी वेढलेल्या काठावर बोटीतून आदित्यचा शोध सुरू होता. तिसऱ्या दिवशी ड्रोनचीही मदत घेण्यात आली. या प्रयत्नांना यश आले नाही. शोधपथकाला मोहीम राबविताना पूर्ण वाढ झालेल्या मगरी सातत्याने नजरेस पडत होत्या. आदित्यचा ठावठिकाणा लागत नव्हता. तो बुडाल्याची शंका पथकाला आल्याने गुरुवारी (ता. २१) शोधमोहीम थांबविण्यात आली. बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी पाण्यावर येतोच, असेही काहीजण बोलू लागल्याने शोधमोहिमेला ब्रेक लागला.

ओरडण्याचा आवाज अन् जवानांची धाव...

व्हाईट आर्मीचे पथक पुन्हा शुक्रवारी सकाळी नदीकाठावर गेले. त्यांनी काठ पिंजून काढण्यास सुरुवात केली. नदी पात्रातील जॅकवेलजवळ असलेल्या २५ फूट खोल खड्ड्यात एक आवाज पथकाच्या कानावर पडला. क्षणाचाही विलंब न करता पथकाने ठिकाण गाठले. आदित्यला पोहता येत असल्याने तो पाण्यावर तग धरून होता. एक पाय फ्रॅक्चर होऊन काठाकडे येण्याच्या प्रयत्नात गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला होता.

मगरींचा वावर अन् भुकेलेला आदित्य

नदीचे शिरढोण पात्र आणि काठावर मगरींचा वावर अलीकडे नित्याचा आहे. अशामध्ये पाच दिवस केंदाळामध्ये अडकलेला आदित्य भुकेने व्याकुळ झाला होता. खायला काहीच नसल्याने त्याने अक्षरशः चिखल खाऊन स्वतःची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. पाण्याने वेढलेला खड्डा नदीपात्रात असून, २५ फूट खोल आहे. पथकाने दोरी टाकून आदित्यला त्यातून बाहेर काढले. बचाव पथकातील व्हाईट आर्मीचे नीतेश वनकोरे, प्रदीप ऐनापुरे, निशांत गोरे, दीपक बामणे, नीलेश वनकोरे, सूरज कोरे, हैदर मुजावर, उदय हावळे, अभिजित चव्हाण, सागर सुतार यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. दरम्यान, आदित्यला सध्या शिरोळमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

काय घडले?

  • चिडलेला आदित्य सोमवारी (ता. १९) घरातून बाहेर पडला

  • त्याचदिवशी शिरढोणमधील पंचगंगेच्या काठावर त्याचे चप्पल मिळाले

  • कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी व्हाईट आर्मीच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली

  • बोटीसह ड्रोनच्या मदतीने मगरींची नजर चुकवित सलग तीन दिवस शोध मोहिम

  • शुक्रवारी सकाळी आदित्यचा आवाज ऐकू आला

  • पथकाने घटनास्थळी धाव घेत आदित्यला २५ फूट खड्ड्यातून बाहेर काढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT