कोल्हापूर

अन् जातीचे दाखले मिळाले...

CD

महिनाभराच्या धडपडीनंतर
...अखेर मिळणार दाखले
कंजारभाट समाजातील २१४ जणांची गैरसोय दूर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : पारंपरिक व्यवसाय सोडून शिक्षण घ्यायचे, तर अडचणींचा डोंगर. शिक्षण व नोकरीसाठी जातीचा दाखला महत्त्वाचा. तो मिळविण्यासाठी धडपड करूनही उपयोग होत नव्हता. अखेर महिनाभर घेतलेल्या कष्टाला यश आले आणि शहर व ग्रामीण भागातील सुमारे २१४ जणांना कंजारभाट जातीचे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कंजारभाट समाजाचा गावठी दारू तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायातून बाहेर पडून अनेक जण शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झाले. ज्यांना जातीचे दाखले मिळाले, त्यांचा प्रश्‍न सुटला. ज्यांच्याकडे १९६१ चा पुरावा नाही, त्यांना अनेक अडचणींचा सामना आजही करावा लागतो. महिनाभरापूर्वी शासकीय स्तरावर जातीचे दाखले देण्यासाठीच्या शिबिरात कंजारभाट समाजाचा समावेश नसल्याची माहिती कंजारभाट समाजाचे अध्यक्ष महेश मछले यांना कळाली. त्यांनी कंजारभाट समाजातील घटकांना जातीचा दाखला मिळविण्यासाठी निवेदन दिले. सुरेंद्र इंद्रेकर, नीलेश मछले, बलराज बागडे, बबलू कराळे, सचिन कराळे, विजय मिणेकर यांनी ३१४ जणांची यादी तयार केली. त्यासाठी १९८५ च्या पुराव्याचा शोध घेण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.
सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार यांच्याकडे जाऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्या. उजळाईवाडी, उचगाव, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी, तामगाव, हालसवडे, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, कंदलगाव, राजेंद्रनगर, मोतीनगर, सुभाषनगर, निगवे खालसा, निगवे दुमाला, वडणगे, शिंगणापूर, शियेमध्ये एक हजारहून अधिक कुटुंबे राहतात. शासकीय नोकरीत दीड हजार, निमशासकीय सुमारे आठशे जण काम करत आहेत. बाराशेहून अधिक मुले-मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. त्यामुळे अखिल भारतीय कंजारभाट समाजातील युवक-युवतींना आता पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
------------------
कोट
जातीचा दाखला मिळवणे, हे कठीण काम आहे. कंजारभाट समाज भटका विमुक्त असून, या समाजाकडे पुरावे कोणते असणार? त्यातही १९६१ पूर्वीचे पुरावे शोधणार कोठून? आमची पिढी पहिल्यांदा शिक्षण प्रवाहात आली. तरीही आज अनेक कुटुंबांकडे जातीचे दाखले नाहीत. या परिस्थितीत प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी कंजारभाट समाजातील लोकांना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शंभर जणांचे दाखले प्रलंबित आहेत. तेही लवकर मिळतील.
- महेश मछले, अध्यक्ष, कंजारभाट समाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT